नागपूर

देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाना पटोले यांना हवयं ऊर्जामंत्रीपद

नीलेश डाखोरे

नागपूर : नाना पटोले (Nana Patole)यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र (Letter to Chief Minister Uddhav Thakare) लिहिले आहे. पत्रात त्यांनी रखुमाई कंपनी निविदेच्या कुठल्याही अटी व शर्थींची पूर्तता करीत नाही. तरीही त्यांना या कामासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. त्यांना गैरमार्गाने पात्र ठरविण्यात आले आहे. हे प्रकरण नियमबाह्य व आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करून स्थगिती द्यावी, असे म्हटले आहे. यावर भाष्य करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी नाना पटोले यांना ऊर्जामंत्रीपद हवे असल्याने आरोप केल्याचे म्हटले आहे. (Devendra-Fadnavis-said-that-Nana-Patole-wants-the-post-of-Energy-Minister)

नागपूर विमानतळावर गुरुवारी (ता. १) आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गुंतागुंत महविकासआघाडीला सोडवायची आहे. त्यांच्यात वाद सुरू आहे. एकमेकांच्या खात्यांवर नजर ठेवली जात आहे. अध्यक्षपदाचा निर्णय होईपर्यंत आपण कमेंट करणार नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

राज्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पत्र ऊर्जा विभागाच्या गैरव्यवहाराशी संबंधित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र ऊर्जा विभागाशी संबंधित नाही. नागपूरच्या खनिकर्म महामंडळात कोळसा खरेदीबाबतचे जे टेंडर आहे त्यामध्ये खूप सारे निर्णय चुकीचे घेण्यात आले आहे, असा उल्लेख पत्रात केल्याचे नाना पटोले वृत्तवाहिणीला मुलाखत देताना म्हणाले.

पत्राचा ऊर्जा विभागाशी कोणताही संबंध नसल्याचे ते म्हणाले. काँग्रेसमध्ये वाद असल्याचे काही लोक दाखवत आहेत. मात्र, कुठलेही अंतर्गत वाद नाही, असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले. यावर भाष्य करताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्यवरच निशाना साधला. त्यांना ऊर्जामंत्री पद हवे असल्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचे ते नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

नाना पटोलेंची भावना स्पष्ट दिसते

नाना पटोले यांना मंत्रीपद हवं आहे. त्यामुळे त्यांनी पत्र लिहिले हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी पत्र लिहून मुद्दे मांडले असून, पुरावेही दिले आहे. त्यामुळे चौकशी झालीच पाहिजे. जेव्हा नाना पटोले म्हणत आहेत की भ्रष्टाचार आहे. प्रदेशाध्यक्ष आपल्या मंत्रीविरोधात भ्रष्टाचार झाल्याचे सांगून चौकशीची मागणी करीत आहेत, तर चौकशी केली पाहिजे. मात्र, या प्रकरणामागे नाना पटोले यांची काय भावना आहे हे स्पष्ट दिसते आहे, असेही फडणवीस म्हणाले.

केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची नेहमी चर्चा

मी दिल्लीला जाईल अशी चर्चा नेहमीच असते. मात्र, आमच्या पक्षात नेते पीएम मोदीजी जे आदेश करतात ते शिरोधार्य असतो. मात्र, ज्याला भाजप आणि महाराष्ट्राचा राजकारण कळत त्याला हे लक्षात येईल की मी महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याची सुतराम शक्यता नाही. मात्र, हे माझे शुभचिंतक आहे. त्यांना वाटतंय की मला दिल्लीमध्ये काहीतरी मिळाले तर त्यांना आनंद होईल. मात्र, माझ्या दिल्लीला जाण्याची शक्यता नाही.

(Devendra-Fadnavis-said-that-Nana-Patole-wants-the-post-of-Energy-Minister)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Assembly Election 2024 Results : सुहास बाबर यांना विक्रमी 27 हजाराचे मताधिक्य; तानाजीराव पाटील ठरले किंगमेकर!

Wani Assembly Election Results 2024 : वणी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली! संजय दरेकरांचा दणक्यात विजय

Raju Navghare Won Wasmat Assembly Election 2024 Result : दुरंगी लढतीत राजू नवघरे विजयी; जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

Aurangabad West Assembly Election 2024 Result Live: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत संजय शिरसाटांनी राखला गड

Mahesh Choughule Won in Bhiwandi West Assembly Election : भिवंडी पश्चिम मतदार संघावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा; महेश चौघुलेंची बाजी

SCROLL FOR NEXT