cm Eknath Shinde Sakal
नागपूर

Dharavi Project: धारावीचा विशेष प्रकल्प; पात्र-अपात्र सर्वांना घरं मिळणार; पण...

ज्या पात्र-अपात्र लोकांना घर मिळणार आहेत त्याचे नियम व अटी काय आहेत हे देखील त्यांनी सांगितलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नागपूर : धारावा पुनर्विकास प्रकल्पात टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप करत शिवसेना नेते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली नुकताच मुंबई मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामधून केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत उत्तर दिलं.

धारावीचा प्रकल्प हा विशेष प्रकल्प असून पात्र-अपात्र सर्वांना यामध्ये घरं मिळणार आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पण यामध्ये नियम व अटी काय आहेत हे देखील त्यांनी सांगितलं. (Dharavi Redevelopment Special project all eligible and ineligible will get houses says Eknath Shinde)

धारावी विशेष प्रकल्प कारण...

मुख्यमंत्री म्हणाले, धारावी पुनर्विकासातील टीडीआर संदर्भातील तरतुदी पारदर्शक आहेत. हा प्रकल्प विशिष्ट प्रकारचा प्रकल्प आहे. यासाठी २००४ पासून प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये निविदा प्रक्रियेत कोणीही प्रतिसाद देत नव्हतं. इथं १० लाख लोक राहतात, ६०० एकरचा हा प्रकल्प आहे. त्यामुळं हा विशिष्ट प्रकारचा महत्वाचा प्रकल्प आहे. याला विशेष सवलती दिल्याशिवाय तो पूर्ण होऊ शकत नाही. या सवलती टेंडरमध्ये टाकण्यात आल्या होत्या. (Latest Marathi News)

अद्याप निविदा अंतिम नाही

म्हणून यामध्ये जे काही आरोप करत आहेत त्यात समजून घेतलं पाहिजे की विकास नियंत्रण नियमावलीत या अनुषंगानं मंत्रिमंडळ मंजुरी आणि टीडीआर संदर्भात प्राथमिक अधिसुचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. २५ डिसेंबरपर्यंत ही अधिसूचना हरकतींसाठी उपलब्ध आहे. त्यावर अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही.

त्यामुळं आरोप करण्यापूर्वी या प्रकल्पाचं सध्याचं स्टेटस काय आहे? कोणाला हरकत असेल तर मोर्चे काढण्यापेक्षा त्यात कायदेशीररित्या सहभाग होण्याची संधी होती पण यावर केवळ राजकारण करायच म्हणून मोर्चा काढला. त्यामुळं प्राथमिक अधिसूचना म्हणजे निर्णय झाला असा आरोप करणं चुकीचं आहे. यामध्ये सहकार्याची भूमिका घेतली असती तर धारावीच्या लोकांना फायदा झाला असता. (Marathi Tajya Batmya)

पात्र-अपात्र लोकांना मिळणार घरं

एसआरएमध्ये फक्त ग्राऊंडफ्लोअरवाल्यांना घर मिळतं वरच्या मजल्यावरील व्यक्तीला नाही. पण हा प्रकल्प असा आहे की यामध्ये सर्वांना घरं मिळणार आहेत. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथ्या मजल्यावरील सर्वांना घरं मिळणार आहेत. असा हा भारतातला एकमेवर प्रकल्प आहे जिथं पात्र-अपात्र सर्वांना घरं मिळणार आहे. पात्र लोकांना छोटे उद्योग आहेत तिथं मिळेल तर जे अपात्र आहेत त्यांना दहा किमी अंतरावर भाडेतत्वावर घरं मिळतील. त्यांना घर विकत घेण्याची मुभा देखील ठेवण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सरकारलाही २० टक्के होणार फायदा

टीडीआरचा विषय आहे त्यातही टेंडरमधून ५० टक्के रक्कम मिळणार आहे. फनेल झोनमुळं उंचीची मर्यादा असल्यानं तो जास्त उंच होऊ शकत नाही. त्यामुळं टीडीआर विकल्याशिवाय तो प्रकल्प होणार नाही. जर ४० टक्के टीडीआर दिला नाहीतर त्याला दुसरीकडून देखील टीडीआर घेता येतो. हा टीडीआर कोणालाही बघता येतो कारण त्याला डीजिटल प्लॅटफॉर्म दिला आहे. याचं अप्पर लिमिट ९० टक्के केलं आहे. यामध्ये केवळ अदानीच नाही तर २० टक्के फायदा सरकारला देखील होणार आहे, अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT