Nagpur Chalo App sakal
नागपूर

Nagpur Chalo App : ‘आपली बस’चा प्रवास ‘कॅशलेस’ क्युआर कोडची व्यवस्था: ‘चलो ॲप’ प्रवाशांच्या सेवेत

Nagpur Chalo App : नागपूरमध्ये 'आपली बस' सेवेत डिजिटलायजेशनची नवी व्यवस्था; प्रवाशांसाठी 'चलो ॲप' सादर. क्यूआर कोडच्या माध्यमातून तिकीट काढणे व अन्य सुविधा मोबाईलद्वारे उपलब्ध.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नागपूर शहरात ‘आपली बस’च्या तिकीटमध्येही डिजिटलायजेशन होत आहे. याकरिता महापालिकेच्या परिवहन विभागाने ‘चलो’ ॲप प्रवाशांच्या सेवेत आणला आहे. ऑनलाइन तिकीट काढणाऱ्यांना पूर्वी प्रमाणे कागदी तिकीट देणे बंद करण्यात येणार आहे.

एकाच मार्गावरील बस किती वेळेत येणार, क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट काढता येणार ही सर्व सुविधा ॲपमध्ये करून देण्यात आली असल्याची माहिती चलो मोबिलिटी ॲपचे वरिष्ठ उपाध्यक्ष अरुण गिदरोनिया यांनी पत्रपरिषदेत दिली.

गेल्या चार महिन्यापासून या ॲपची चाचणी सुरू आहे. आता पर्यंत जवळपास ४० हजार प्रवाशांनी हा ॲप डाऊनलोड केला आहे. देशातील ६० पेक्षा जास्त शहरात या ॲपची सेवा शहर वाहतुकीसाठी सुरू आहे. महाराष्ट्रात मुंबई, छत्रपती संभाजी नगर आणि आता नागपूरकरांच्या सेवेत हा ॲप आणला आहे. बसमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी बसमध्ये किती प्रवासी आहेत. त्यात सीट मिळणार का? बस कोणत्या वेळेत स्थानकावर येणार याचे अचूक लोकेशन, क्यूआरकोडने ऑनलाइन तिकीट, विद्यार्थ्यांसह इतरही प्रवाशांच्या पासेस, ॲपवरुन वाहकाला पैसे दिल्यास मोबाईलवरच तिकीट दिसणार आहे.

पास डिजिटल स्वरुपात

पास दाखवल्यावरही मोबाईलवर तिकीट दिसणार आहे. या पास डिजिटल स्वरूपात असणार आहेत. गेल्या चार महिन्यात २० टक्के ही सुविधा डिजिटल स्वरूपात झाली असल्याची माहिती गिदरोनिया यांनी दिली. पत्रपरिषदेला मनपाच्या परिवहन विभागाचे व्यवस्थापक गणेश राठोड, अधिकारी विकास जोशी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Adani Group: अदानींना एकाच वेळी 3 मोठे झटके, 600 दशलक्ष डॉलरची योजना रद्द, केनिया करारही रद्द आणि...

Nashik Vidhan Sabha Election 2024 : वाढलेला टक्का, कोणाच्या छातीत कळ, कुणाला पाठबळ..? उमेदवारांमध्येच चर्चा

केवळ तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं... प्राजक्ता माळीची इन्स्टावर नवी पोस्ट, हसऱ्या चेहऱ्याने दिली आनंदाची बातमी

Maharashtra Satta Bazar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? बुकींची कोणाला पसंती? मविआ महायुतीला सट्टाबाजारात किती मिळतोय भाव?

SCROLL FOR NEXT