नागपूर

सावधान! सोशल मीडियावर लहान मुलांचे 'हे' फोटो चुकूनही करू नका शेअर; अन्यथा...

अनिल कांबळे

नागपूर : अनेक जण गंमत म्हणून बालकांचे नग्न, अर्धनग्न चित्र सोशल मीडियावर (Social Media) टाकतात. ते चित्र काही जण आपापल्या वॉलवर शेअर करतात. परंतु, असे करत असाल तर आजच सावध व्हा. कारण, सायबर क्राइम सेलचा (Cyber Crime Cell) सोशल मीडियावर ‘वॉच’ असून पोस्ट करणारे आणि शेअर करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. गेल्या आठवड्यात पोलिसांनी सीताबर्डी आणि गणेशपेठ पोलिस ठाण्यात (Nagpur Police) १४ गुन्हे दाखल केले आहेत. (Do not share photos of children on social media Nagpur police filed FIR)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा सोशल मीडियावर गंमत म्हणून लहान मुलांचे अर्धनग्न किंवा नग्न असलेले स्केच, फोटो आणि व्हिडिओ शेअर होत असतात. केवळ मनोरंजन व्हावे हाच उद्देश असतो. परंतु, ही गंमत चांगलीच भारी पडू शकते. जाहिरातीसाठी किंवा कोणत्याही प्रयोजनासाठी बालकांच्या खासगी भागास फेसबुक किंवा इन्स्टाग्राम इत्यादी सोशल नेटवर्किंग साइटवर टाकल्यास संबंधित व्यक्तीच्या विरोधात कलम ६७ (बी) माहित तंत्रज्ञान अधिनियम आणि कलम १५(१)(३) लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात येतो.

नागपूर सायबर क्राइम पोलिसांनी आतापर्यंत सोशल मीडियाद्वारे अनेकदा जनजागृती केली आहे. अनेकांनी पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गेल्या महिन्याभरात सायबर पोलिसांनी स्वतःहून दखल घेऊन १४ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सीताबर्डीत ६ तर गणेशपेठ पोलिस ठाण्यात ८ गुन्हे दाखल करून संबंधित सोशल मीडिया ॲप वापरणाऱ्या तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

असा होईल गुन्हा दाखल

फेसबुक किंवा इन्स्टाग्रामसह अन्य कोणत्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून लहान मुलांचे अश्लील फोटो व्हायरल झाल्यास सायबर पोलिस त्यावर वॉच ठेवतात. फोटो व्हायरल करण्यासाठी कोणत्या Profile URL चा वापर झाला आहे? त्याचे Screen/User Name-काय आहे ? त्यांचा ESP User ID कोणता आहे? व नमूद आरोपींनी कोणत्या तारखेला व कोणत्या ठिकाणावरून बाल फोटो/व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइटवर टाकला आहे, याचा टेक्निकली शोध घेतला जातो. नमूद घटना कोणत्या मोबाईलद्वारे कारण्यात आलेली आहे याचा शोध घेऊन संबंधित आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात येतात.

मोबाईल आणी सोशल मीडिया जबाबदारीपूर्वक हाताळावा. लहान मुलांचे फोटो केवळ गंमत म्हणूनही सोशल मीडियावर शेअर करू नका. तसेच असे फोटो फारवर्डही करू नका. अशी कृती गुन्हा ठरतो. त्यामुळे सोशल मीडियावर असे अपलोड किंवा फारवर्ड करताना सतर्क राहा.
-केशव वाघ, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राइम

(Do not share photos of children on social media Nagpur police filed FIR)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT