nagpur esakal
नागपूर

Nagpur: डॉक्टरांचा निष्काळजीपणा शवविच्छेदनानंतर ही बंदुकीची गोळी शरीरात; नातेवाइकांना मनःस्ताप

मोहकच्या शवाचा पोलिसांनी पंचनामा केला

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

एका १९ वर्षीय युवकाला दोन गोळ्या लागल्या. शस्त्रक्रियेने एक गोळी काढली. चार दिवसांच्या उपचारानंतर हा तरुण दगावला. विच्छेदनासाठी शव मेडिकलच्या शवागारात पाठवले. डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. मात्र शरीरातील एक गोळी तशीच राहिली.

नातेवाईक बैतुलकडे शव घेऊन निघाल्यानंतर बंदुकीची गोळी शवाच्या शरीरातच असल्याचे उघड झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. अर्थ्या वाटेतून शव परत मेडिकलमध्ये आणून गोळी काढण्यात आल्याची माहिती उघडकीस आली.

बंदूक स्वच्छ करीत असताना मोहक कोकास (१९, बैतूल) या तरुणाला सहा दिवसांपूर्वी दोन गोळ्या लागल्या होत्या. तातडीने मेडिकलमध्ये उपचारासाठी आणले. येथील ट्रॉमा युनिटमध्ये दाखल केले. त्याच्यावर शस्त्रक्रिया केली.

दरम्यान एक गोळी स्वादूपिंडाच्या खालच्या भागात पेरिटोनियममध्ये शिरली होती. डॉक्टरांनी जीव वाचविण्याच्या प्रयत्नात गोळी काढली नाही. दरम्यान दोन दिवसांपूर्वी मोहकचा मृत्यू झाला. मेडिको लिगल केस असल्यामुळे शवविच्छेदन गरजेचे होते.

मोहकच्या शवाचा पोलिसांनी पंचनामा केला. मात्र उपचारासंदर्भातील केसपेपर ट्रॉमामध्ये होते. पेपर नसल्याने शवविच्छेदन उरकून घेतले. ऑटोप्सीसह शवविच्छेदन करून मोहकचे शव नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले.

नातेवाइकांनी वाहिकेतून शव बैतूलकडे घेऊन निघाले. दरम्यान शल्यचिकित्सक आणि शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यक तज्ज्ञांच्या संवादातून बंदुकीची गोळी मोहकच्या शरीरातून काढण्यात आली नसल्याचे उघड झाले.

यामुळे एकच खळबळ उडाली. ही गोळी कायद्यानुसार न्यायसहाय्यक प्रयोगशाळेकडे पाठवणे गरजेचे आहे. मात्र शवाच्या शरीरात ती गोळी होती.

तत्काळ नातेवाइकांना फोन केला. अर्ध्या वाटेतून मोहकचे शव पुन्हा मेडिकलच्या शवविच्छेदन विभागात आणले. हा एक प्रकारे डॉक्टरांचा हलगर्जीपणाच असल्याचे बोलले जात आहे.

डॉक्टरांचा निष्काळजीपणा

पोलिसांच्या मध्यस्थीने मोहकचे शव घेऊन निघालेली वाहिका अर्ध्या वाटेवरून परत फिरवली. मेडिकलच्या विच्छेदन विभागात शव आणले. पांढऱ्या कपड्यात लपेटलेले शव पुन्हा विच्छेदन टेबलवर ठेवून शरीरातील गोळी काढण्यात आली.

शरीरातील स्वादूपिंडाखालच्या भागात अडकून पडली असल्याने ती दिसली नव्हती. दुसऱ्यांदा शव नातेवाइकांच्या स्वाधीन केले. नातेवाइकांना मोठ्या प्रमाणात मनःस्ताप सहन करावा लागला. निष्काळजीपणामुळेच हे प्रकरण घडले असल्याची प्रतिक्रिया नातेवाइकांनी नोंदवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : प्रियांका गांधी यांची आज 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा; कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजन

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT