dr babasaheb ambedkar international airport sakal
नागपूर

Airport : विमानतळावर ‘हाय अलर्ट’; बॉम्ब ठेवल्याची धमकी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी बॉम्ब ठेवल्याची धमकी ई-मेलमधून मिळताच प्रचंड खळबळ उडाली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी बॉम्ब ठेवल्याची धमकी ई-मेलमधून मिळताच प्रचंड खळबळ उडाली. विमानतळावर सकाळी अग्निशमन दल, बॉम्ब निकामी पथक, श्‍वान पथक आणि पोलिस दाखल झाले आणि संपूर्ण विमानतळाची तपासणी केली. मात्र, कुठेच बॉम्ब सदृश काहीही आढळले नाही. सुरक्षेच्या कारणास्तव ई-मेल कुठून आला, कुणी केला याचा शोध लागतपर्यंत विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सोमवारी देशातील अनेक विमानतळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. त्यापाठोपाठ आता नागपूरच्या विमानतळ उडविण्याची धमकी थेट केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या संचालकांना ई-मेलद्वारे करण्यात आली. यामुळे प्रशासनात खळबळ उडाली. नंतर परिसरात अतिशय कडक तपासणी करण्यात आली.

त्याचा फटका काही प्रमाणात प्रवाशांनाही बसल्याची माहिती पुढे आली आहे. धमकीमुळे सर्वत्र घबराट पसरली होती. विमानतळ सुरक्षा कर्मचारी आणि बॉम्ब निकामी पथकाने शोधमोहीम राबवली. ई-मेलमध्ये कुठे बॉम्ब ठेवला आहे याचा उल्लेख नव्हता. पोलिस दलाकडून कसून तपासणीनंतर विमानतळावर काहीच न आढळल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळ बॉम्बने उडविण्याच्या धमकीचा इ मेल सोमवारी सकाळी मिळाला. तातडीने सर्वच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि विमानतळाची तपासणी केली गेली. तपासणीत काहीही संशयास्पद आढळले नाही. मात्र, विमानतळावरील सुरक्षा वाढविण्यात आलेली असून हाय अलर्ट दिलेला आहे.

- आबीद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक. नागपूर विमानतळ

अधिकाऱ्यांची समिती स्थापन

मात्र, ई मेल कुठून आला. धमकी देणारा व्यक्ती कोण याचा शोध लागतपर्यंत विमानतळावर हाय अलर्ट दिलेला आहे. या प्रकरणी एक उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे नागपूरसह मुंबई, गोवा, भोपाळ, कोलकत्तासह इतरही शहरातील विमानतळांवर अशी धमकी देण्यात आलेली आहे.

धावपट्टीच्या दुरुस्तीची धावपळ

धावपट्टीची दुरुस्ती आणि त्यावर थर टाकण्याची (रिकार्पेटिंग) प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सकाळी साडे नऊ वाजेपर्यंतच विमानाची ये- जा सुरु असते. कारण सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे. सकाळीच इ मेल प्राप्त झाल्याने विमानतळ प्रशासनातही खळबळ उडाली. परिणामी, विमानतळावर संपूर्ण तपासणी करण्याचे आव्हान होते. तपासणीत काहीच न आढळल्याने सर्वांना हायसे वाटले आणि तातडीने विमानाचे उड्डायण सुरु केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT