drive safely tips precautions taken to avoid accidents Self Hypnosis Hetero Hypnosis health  sakal
नागपूर

Precautions To Avoid Accidents : सफर सुहाना, पण सावधगिरी गरजेची

‘जिंदगी एक सफर हैं सुहाना’, परंतु हा सफर सुहाना करणे फक्त आणि फक्त आपल्या हाती असते. गाडी चालवताना काही बाबी कटाक्षाने पाळून तुम्ही नक्कीच हा सफर सुहाना करू शकता.

सकाळ वृत्तसेवा

‘जिंदगी एक सफर हैं सुहाना’, परंतु हा सफर सुहाना करणे फक्त आणि फक्त आपल्या हाती असते. गाडी चालवताना काही बाबी कटाक्षाने पाळून तुम्ही नक्कीच हा सफर सुहाना करू शकता.

कोणतेही वाहन चालविताना त्यात बसलेला प्रत्येक प्रवासी महत्त्वाचा आहे. तो माझाच आहे, ही भावना चालकामध्ये असली पाहिजे. अन्यथा ‘नजर हटी, दुर्घटना घटी’, व्हायला वेळ लागत नाही. ‘जिंदगी एक सफर हैं सुहाना’, परंतु हा सफर सुहाना करणे फक्त आणि फक्त आपल्या हाती असते. गाडी चालवताना काही बाबी कटाक्षाने पाळून तुम्ही नक्कीच हा सफर सुहाना करू शकता.

- नवनाथ गायकवाड

संमोहन अवस्थेत जाण्याचे दोन प्रकार आहेत.

१. स्व-संमोहन (Self Hypnosis)

२. पर संमोहन (Hetero Hypnosis )

स्व-संमोहन

व्यक्ती जाणीवपूर्वक स्वतःला मनातल्या मनात वा मोठ्या आवाजात सूचना देऊन ही अवस्था प्राप्त घेऊ शकतो. हे कौशल्य स्व-संमोहन कार्यशाळेत प्राप्त करून व्यक्तिमत्त्व विकास व मनोशारीरिक आजार, वाईट सवयीतून बाहेर पडू शकतो.

स्व-संमोहन प्रक्रिया करताना व्यक्ती पहिल्या तीन अवस्थेतच राहतो. गाढ अवस्थेत जात नाही. स्व-संमोहनाची Sponataneus Self Hypnosis एक गाढ अवस्था असून, व्यक्ती मनावर झालेल्या संस्काराप्रमाणे या अवस्थेत जातो.

हा स्व-संमोहनाचा भाग असून यात भूत लागणे, एखादा बाबा वा देव अंगात येणे हे प्रकार मोडतात. मनावर झालेल्या संस्काराप्रमाणे या अवस्थेतून तो व्यक्ती बाहेर पडतो. एकसारखा आवाज, गाणी, एकसारखी लयबद्ध टाळी, घंटा, नगारे, डफडा, एखाद्या ठिकाणचा सुगंध किंवा विशिष्ट ठिकाण व्यक्तीस संस्काराप्रमाणे या अवस्थेत घेऊन जाते.

या अवस्थेत व्यक्तीला सर्व ज्ञानेंद्रियांना भ्रम होतात तर कधी व्यक्तिभ्रम होऊन मी अमूक आहे, असेही सांगतो. त्या व्यक्तीबद्दल जी माहिती असेल तेच तो सांगतो. वा काल्पनिक इतिहासाची माहिती देतो. या अवस्थेतून बाहेर आल्यानंतर व्यक्ती पूर्ववत वागतो. काही जण व्यक्तिगत स्वार्थासाठी या अवस्थेत गेल्याचे ढोंग करतात.

पर संमोहन

दुसऱ्याच्या आदेशाने या अवस्थेत व्यक्ती जातो म्हणून याला पर संमोहन म्हणतात. व्यक्तीची इच्छा असेल तरच संमोहन तज्ज्ञाच्या आदेशाने वरील चारही अवस्थेत जाता येते व संमोहन उपचार करवून घेता येतात.

म्हणून कोणतेही संमोहन हे स्व-संमोहनच असते. संमोहन तज्ज्ञ संमोहन स्टेज शो करताना संमोहन उत्सुक पात्रांना गाढ संमोहन अवस्थेत नेऊन अनेक मनोरंजनात्मक कृत्ये करवून घेतात. या अवस्थेत व्यक्तीला सर्व ज्ञानेंद्रियांना भ्रम होतात तर कधी व्यक्तिभ्रम होऊन मी अमूक-अमूक आहे असेही तो सांगतो. अनुभवी संमोहन तज्ज्ञ मनोरंजनापेक्षा समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन व सकारात्मक दृष्टिकोनावर हे विषय हाताळून बरेच संमोहनाबाबतचे गैरसमज दूर करतात.

अपघात होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?

चालकाने वाहनावर चढण्यापूर्वीच वा स्टिअरिंगला हात लावताच स्वतःला काही सूचना द्याव्या.

१) मी आज माझे हे वाहन अत्यंत सुरक्षित व सफाईदारपणे चालवेल.

२) मी माझे वाहन सुरक्षित व सावधपणे चालवून माझ्या घरी, कुटुंबात सुखरूप पोहोचेल.

३) माझ्या वाहनातील सर्व प्रवासी माझ्यावर विश्वास ठेवून बसले आहेत. त्यामुळे त्यांना सुखरूप सोडेन.

४) वेगाच्या नियंत्रणातच मी वाहन चालवेन. प्रत्येक पाच ते सहा किलोमीटरवर वाहनाचा वेग कमी-जास्त करेन.

५) प्रत्येक थांब्यावर मी वाहनांची हवा, पाणी, इंधनाची तपासणी करूनच मार्गक्रमण करेन.

६) वाहनातील सहकारी व असिस्टंट झोपणार नाही याची काळजी घेऊन अधूनमधून त्याच्यासोबत चर्चा करेन.

७) वाहन चालविताना माझ्या शरीराची अधूनमधून हालचाल करीत राहील व स्वतःला सावध ठेवेन.

८) काही काणास्तव प्रवासी चिडल्यास त्यांच्याशी शांतपणे वागेन. स्वतःचे मन शांत ठेवणार.

अशा आत्मसूचना देण्याचे प्रशिक्षण चालकास वाहन परवाना देताना दिल्यास नक्कीच अपघाताचे प्रमाण कमी होईल.

शासनाने घ्यावयाची काळजी

१) राज्यात काही सुसज्ज एअर ॲम्ब्युलन्सची व्यवथा करावी. जेणेकरून अपघातग्रस्तांना त्वरित उपचार मिळतील. हेल्पलाईन नंबर ठिकठिकाणी असावे.

२) वाहनचालक व असिस्टंट यांना ताणतणाव व्यवस्थापन, संवाद कौशल्य व कुटुंब व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिल्यानंतरच परवाना द्यावा.

३) प्रत्येक थांब्यावर स्पिकरवरून चालकांनी सुरक्षित वाहन चालवून वाहन इथपर्यंत आणल्याबद्धल अभिनंदन व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा द्याव्या.

४) द्रुतगती महामार्गावर वाहन चढविण्यापूर्वी वाहन चालकांना सुरक्षित वाहन चालवून सुखरूप कुटुंबात पोहोचण्याबाबत बोर्ड वा बॅनर असावे.

५) द्रुतगती महामार्गावर चढण्यापूर्वी प्रत्येक ठिकाणी टायरची स्थिती, हवा व नशा तपासणी करण्यात यावी.

६) प्रत्येक पाच-सहा किलोमीटरवर पिवळ्या आडव्या पट्ट्या वा रेडियमच्या पट्ट्या असाव्या. तसेच चमकणारे लाईट असावे.

७) प्रत्येक १० किलोमीटरवर आवाज व कंप करणाऱ्या आडव्या पांढऱ्या पट्ट्या असाव्या,

८) आपण दहा किलोमीटर अंतर पार केले. त्याबद्दल अभिनंदन व पुढील प्रवासास शुभेच्छा असे संकेत यंत्र वाहनात असावे.

९) प्रत्येक ६० किलोमीटरवर चहा, नाश्ता, जेवणाची तसेच इंधनाची सोय असावी.

१०) प्रत्येक १०० किलोमीटरवर तातडीची सेवा उपलब्ध करणारे हॉस्पिटल असावे.

११) प्रत्येक १०० किलोमीटरवर गतीदर्शक कॅमेरे असावेत.

१२) प्रत्येक वाहनावर गती नियंत्रण नियम घालून दिल्याप्रमाणे तेवढ्या गतिबंधनातच वाहन चालेल असे शासनाकडून प्रमाणपत्र देऊन तसे पुढील काचेवर लावावे.

१३) वाहनात एजन्सीचे व्यवस्थापक वा मालकाचा संपर्क नंबर असावा.

वरील नियमांचे पालन करून वाहनमालक, वाहनचालक, प्रवासी व शासनाने स्वतःची जबाबदारी पार पडल्यास कुठेही प्रवासाचा आनंद उपभोगून अपघाताचे प्रमाण अत्यल्प करता येणे शक्य आहे.

संमोहन तज्ज्ञ आणि वक्ता

नागपूर

मो. ९८२३९००२५३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Vidhan Sabha: ''शिवसेनावाल्यांची माफी मागतो.. त्याशिवाय विशाल पाटील खासदार होऊच शकले नसते'', बाळासाहेब थोरातांचा सांगलीत खुलासा

Share Market Today: शेअर बाजारात काय होणार? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

IND vs AUS : विराट कोहलीचा डिफेन्स, जसप्रीचा बाऊन्सर अन् टीम इंडियाचे ऑस्ट्रेलियाला चॅलेंज, Video

Latest Maharashtra News Updates : माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं निधन

'महाराष्‍ट्र लुटून गुजरातचा विकास करणाऱ्या बाप-लेकांना सिंधुदुर्गात थारा देऊ नका'; उद्धव ठाकरेंचा राणे घराण्यावर हल्ला

SCROLL FOR NEXT