ST Strike sakal
नागपूर

नागपूर : एसटी संपामुळे ४० टक्के व्यवसाय बुडाला

लग्नसराईच्या खरेदीला ब्रेक : ग्रामीण भागात वस्तूंची टंचाई

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यातील प्रवासी वर्ग व व्यापारीही प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. देशव्यापी लॉकडाउननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यातील कोट्यवधीचा व्यापार प्रभावित झाला आहे. ग्रामीण भागात वस्तू पाठवणेही अवघड झाल्याने काही गावांमध्ये वस्तूंची टंचाई जाणवू लागल्याची माहिती पुढे आली आहे.

एसटी महामंडळ शासनात विलीन करा, या मागणीसाठी गेल्या तीन आठवड्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. याचा फटका एसटी महामंडळ आणि व्यापारालाही बसतो आहे. एसटी सुलभ आणि स्वस्त पर्याय आहे. मात्र, एसटीच बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिक बाजारपेठेत खरेदीसाठी येणे थांबले आहे.

त्यावर काही व्यापाऱ्यांनी त्यावर तोडगा काढत व्हॉटसॲप आणि इतर सोशल मिडियाच्या माध्यमातून वस्तूंची मार्केटिंग करीत आहे. मात्र, ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा आणि विजेच्या पुरवठ्याच्या अडचणी आहेत. त्यामुळे अनेक ग्रामीण भागातील दुकानांमध्ये मालाची टंचाई जाणवू लागलेली आहे. दिवाळीनंतर लग्नसराईचा मोसम सुरु होतो. शेतमाल विकल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा आला आहे. त्यामुळे बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढून अर्थचक्राला चालना मिळते. मात्र, सध्या एसटी बंद असल्याने ते सर्वच व्यवहार ठप्प पडले आहे. दिवाळीनंतर लग्नसराईसाठी बाजारात होणारी गर्दीच गायब झाली आहे. परिणामी, अनेकांच्या हातचा रोजगारही गेला आहे.

अडचणीत सापडलेले क्षेत्र

"हॉटेल, रेस्टॉरंट, रिक्षा चालक व मालक, माल वाहतूकदार, टी स्टॉल चालक, पानठेले चालक"

नागपूर देशाच्या हृदयस्थानी असून शहराच्या आजूबाजूच्या १५० ते २०० किलो मीटरचे व्यापारी शहराच्या व्यापारावर अवलंबून आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून एसटी बंद असल्याने शहरातील व्यापार प्रभावित झाला आहे. ३० ते ४० टक्के व्यवसाय कमी झालेला आहे. कोरोनानंतर बाजारपेठा सुरळीत सुरु झाल्यानंतर व्यवसायाला चांगले दिवस येतील असे वाटत असताना लग्न सोहळ्याच्या तोंडावर एसटीच्या संपाने व्यापाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

- बी.सी. भरतीया, अध्यक्ष, अखिल भारतीय व्यापारी महासंघ

विदर्भातील अनेक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसाठी नागपूर ही घाऊक बाजारपेठ आहे. लहानासह मोठे व्यापारी विविध वस्तूंच्या खरेदीसाठी शहरात येत असतात. मोठे व्यापारी खासगी वाहनाने शहरात खरेदीसाठी येऊ लागले असून एसटी बंद असल्याने लहान व्यापारी अडचणीत सापडले आहे. परिणामी, ४० टक्क्यापेक्षा अधिक व्यवसाय ठप्प झाला आहे.

- अशोक संघवी अध्यक्ष, नागपूर जनरल मर्चंट असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT