Eight Vidarbha cricketers in IPL auction this year nagpur sport IPL Cricket
नागपूर

IPL Auction : आयपीएल लिलावात यंदा विदर्भाचे आठ क्रिकेटपटू

आयपीएलचा बहुप्रतिक्षित लिलाव येत्या २३ डिसेंबर रोजी कोची येथे पार पडणार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आयपीएलचा बहुप्रतिक्षित लिलाव येत्या २३ डिसेंबर रोजी कोची येथे पार पडणार आहे. यावर्षीच्या लिलावात विदर्भाचे तब्बल आठ क्रिकेटपटू राहणार आहेत. त्यामुळे यातील कुणाला लॉटरी लागते, हे लवकरच कळणार आहे. आयपीएलच्या १६ व्या हंगामासाठी होत असलेल्या लिलावात २७३ भारतियांसह देशविदेशातील तब्बल ४०५ खेळाडूंचा सहभाग असणार आहे. यात आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला अपूर्व वानखेडे, अष्टपैलू अक्षय कर्णेवार, सलामीवीर आर. संजय, फिरकीपटू आदित्य सरवटे, मध्यमगती गोलंदाज यश ठाकूर, हर्ष दुबे, रजनीश गुरबानी व शुभम कापसे या वैदर्भी खेळाडूंचा समावेश आहे. यातील बहुतांश खेळाडूंनी अलीकडे पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० आणि विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे यावेळी कुणाला लॉटरी लागते किंवा कोणाचे नशीब फळफळते, याकडे साऱ्यांचेच लक्ष राहणार आहे.

विदर्भाचे उमेश यादव, जितेश शर्मा, अथर्व तायडे व दर्शन नळकांडे हे चार खेळाडू यापूर्वीच आयपीएलमध्ये खेळत आहेत. यातील मध्यमगती गोलंदाज उमेश हा कोलकाता नाईट रायडर्सचे, जितेश व अथर्व हे पंजाब किंग्जचे आणि अष्टपैलू दर्शन गतवर्षी प्रथमच विजेतेपद मिळविणाऱ्या गुजरात टायटन्सचे प्रतिनिधित्व करीत आहेत. मूळ अमरावतीकर असलेल्या जितेशने पदार्पणातच धमाकेदार प्रदर्शन करून क्रिकेटप्रेमींची मने जिंकली होती. दर्शननेही दोन सामन्यांमध्ये आपली छाप सोडली होती. उमेशनेदेखील आतापर्यंत विविध संघांचे प्रतिनिधित्व करीत आपले स्थान मजबूत केले आहे. अथर्वला मात्र संधी मिळाली नव्हती.

आयपीएल लिलावात यंदा...

आयपीएलमध्ये खेळत आहेत. यातील मध्यमगती गोलंदाज उमेश हा कोलकाता नाईट रायडर्सचे, जितेश व अथर्व हे पंजाब किंग्जचे आणि अष्टपैलू दर्शन गतवर्षी प्रथमच विजेतेपद मिळविणाऱ्या गुजरात टायटन्सचे प्रतिनिधित्व करीत आहेत. मूळ अमरावतीकर असलेल्या जितेशने पदार्पणातच धमाकेदार प्रदर्शन करून क्रिकेटप्रेमींची मने जिंकली होती. दर्शननेही दोन सामन्यांमध्ये आपली छाप सोडली होती. उमेशनेदेखील आतापर्यंत विविध संघांचे प्रतिनिधित्व करीत आपले स्थान मजबूत केले आहे. अथर्वला मात्र संधी मिळाली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT