नागपूर : चीननेही भारतातील व्यापाऱ्यांना थेट इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या (electronic gadget) विक्रीवर बंधने आणली आहेत. त्यामुळे सिंगापूर, हाँगकाँगमार्गे भारतात या वस्तूंची आवक होऊ लागल्याने आता इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे भाव (electronic gadget rates) ३० ते ६० टक्क्यांनी वाढले आहे. या महागाईचा फटका ग्राहकांना बसू लागला आहे. परिणामी सर्वसामान्यांना ऑनलाइनच्या शिक्षणाचा (online education) खर्च भार वाटू लागला आहे. (electronic gadget rates increased)
कोरोनाच्या प्रभावामुळे देशभरात टाळेबंदी करण्यात आल्याने शाळा-महाविद्यालये बंद झालीत. सर्वच शिक्षण ऑनलाइन दिले जाऊ लागले. त्याचवेळी चिनी मालाच्या आयातीवर बंधने आणली. त्यामुळे पहिल्या लाटेत लॅपटॉप, कॉम्प्युटर, प्रिंटरसह इतरही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती १० ते १५ टक्के वाढल्या होत्या. मात्र, दुसऱ्या लाटेनंतर चीननेही भारतातील व्यापाऱ्यांना थेट वस्तूंची विक्री बंद केल्याने भाव कडाडले आहेत.
मोबाईलपासून ते घरातील विजेचे दिवे, विविध प्रकारचे स्विच, इलेक्ट्रॉनिक उपकरणे त्याचबरोबर सेमी कंडक्टर, मदरबोर्ड यांची चीनमधून आयात केली जाते. भारतीय बाजारपेठ आणि इतर देशांच्या तुलनेत या वस्तू चीनमधील बाजारातून स्वस्तात मिळत होत्या. आता चीनचा माल सिंगापूर आणि हाँगकाँगमार्गे भारतात दाखल होत असल्याने वाहतूक आणि त्या देशातील कराचा बोझा ग्राहकांवर पडल्याने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे भाव वाढले आहेत. आवक कमी झाल्याने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा तुटवडा अजूनही जाणवतो आहे. आता डिझेलचे दर वाढल्याने पुन्हा भाववाढ होण्याची शक्यता आहे.
भारतातील अनेक कंपन्या चीनमधून सुटे भाग आणून वस्तूंची निर्मिती करतात. सध्या आयात ठप्प झाली असल्याने हे सुटे भाग मिळणेही बंद झाले आहे. त्यामुळे ४० ते ६० टक्के भाववाढ झालेली आहे. कोरोनाकाळात सामान्य नागरिक आपल्या पाल्यांना ऑनलाइन शिक्षण कसा देईल?-जयप्रकाश पारेख, माजी सचिव, एनव्हीसीसी
ऑनलाइन शिक्षणासाठी लॅपटॉप अथवा कॉम्प्युटर घ्यायचा होता. मागील वर्षीही एक कॉम्प्युटर घेतला असल्याने त्यानुसार माझे बजेट मी तयार केलेले होते. मात्र, यंदा भावच कडाडल्याने हिरमोड झाला आहे.-प्रमोद जोशी, ग्राहक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.