राज्यात सक्तवसुली संचलनालयाचा कारवाईचा सपाटा सुरू आहे. महाविकास आघाडीचे विविध नेते ईडीच्या रडारवर असल्याचं दिसतंय. सध्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ईडीच्या कोठडीत आहेत. त्यानंतर आता नाना पटोले यांचे वकिल सतीश उकेंवर ईडीने छापा टाकला आहे. त्यांच्या नागपुरातील घरात ही झाडाझडती सुरू आहे. (ED Raided Satish Uke House)
नाना पटोलेंचा गावगुंड 'मोदी' सतीश उके यांनीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन समोर आणला.नागपूरचे पोलीस आय़ुक्त यांच्याविरोधातही त्यांनी माहिती दिली होती. नाना पटोले यांनी नितीन गडकरींविरोधात केस दाखल केली आहे. या खटल्यात सतीश उके पटोलेंचे वकिल आहेत.
महत्वाचे मुद्दे
नाना पटोले यांचे वकील ऍड. सतीश उके यांच्या घरी ईडी चा छापा
आज सकाळी ईडी ची टीम पोहचली सतीश उके यांच्या घरी
नाना पटोले यांनी दाखल केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात सतीश उके वकील
रोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही खटला लढताहेत सतीश उके
सतीश उके यांची फडणवीस आणि भाजप विरोधात भूमिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.