नागपूर

भंगार इमारतीतून १५ दिवसांत सुसज्ज हॉस्पिटल; इतिहासातील पहिलीच यशोगाथा

केवल जीवनतारे

नागपूर : राखेतून पुन्हा एकवार झेप घेणाऱ्या फिनिक्‍स पक्षाची कथा नेहमीच सांगितली जाते. मात्र, वर्षानूवर्षापासून धूळखात पडलेल्या भंगार झालेल्या इमारतीतून नव्याने आरोग्यदायी संस्था (Health Institutions) अवघ्या १५ दिवसांत उभी करण्याची किमया नागपुरात घडली. कोरोनाच्या आणीबाणीच्या (coronavirus) काळात खडतर परिश्रम करून जनतेमधील अनारोग्य दूर करण्यासाठी १५ दिवसांत सुसज्ज असे कोविड रुग्णालय (Equipped covid Hospital) उभे करण्याची इतिहासातील पहिलीच यशोगाथा. (Equipped hospital in 15 days from the rubble building)

१९७० च्या काळात देशाच्या हृयस्थानी असलेल्या नागपुरातील गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या दर्जाचे होते. २०१२ मध्ये हे रुग्णालय बंद पडल्याचे ऐकिवात आहे. मात्र, त्यापूर्विपासूनच येतील आरोग्य सेवा घरघर करीत होती. जिल्ह्यातील साडेचार लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोना झाला. यातील ३० टक्के लोकांना रेमडेसिव्हिर, स्टिराईडवरील उपचार झाले. यामुळे अशा कोरोनामुक्त रुग्णांमध्ये बुरशीजन्य आजारांसह हृदय, फुफ्फुस, किडनी, मेंदू अशा महत्त्वाच्या अवयवांच्या कार्याशी निगडित अनेक शारीरिक व्याधी उद्भवत असल्याचे पुढे येत आहे. या आजारांवरील रुग्णांना येथे शासकीय दरातून उपचार मिळतील, असा विश्वास डॉ. दंदे फाउंडेशनतर्फे देण्यात आला आहे.

इतिहास

धरमपेठेतील नागरिक सहकारी रुग्णालयापूर्वी शासनाचे स्टोअर रूम होते. येथे रुग्णालय मंजूर झाल्यानंतर नागपूर सुधार प्रन्यासने ही जागा लिजवर दिली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अर्थसहाय केले. १९६५ ते १९७० च्या काळात ४२ खाटांचे धर्मादाय तत्त्वावरील रुग्णालय तयार झाले. नाशिकराव बाळासाहेब तिरपुडे या संस्थेचे अध्यक्ष राहिले होते. डॉ. बालचंद्र खांडेकर अजूनही या समितीवर आहेत.

तीन मजल्याच्या या रुग्णालयात शहरातील प्रसिद्ध सर्जन, फिजिशियन, गायनिक मेडिसिन डॉक्टर्सनी सेवा दिली. टायफाईड (विषम ज्वर) वरील उपचार, एक्स-रे मशीन, पॅथॉलॉजी विभाग रुग्णालयात होता. प्रसिद्ध वकील, न्यायमूर्ती हे देखील या रुग्णालयात विश्‍वासाने उपचार घेत असत. शासनाकडून निधी मिळत होता. मात्र, हळूहळू रुग्णालय तोट्यात आले.

सहकारी बँकेचे कर्ज चढले. पुढे रुग्णालय बंद पडले. आता डॉ. दंदे फाऊंडेशनकडे रुग्णालयाची जबाबदारी आली. शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य क्षेत्रातील सेवाभावी संस्था म्हणून डॉ. दंदे फाउंडेशनची ओळख शहराला आहे. यामुळे या रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्यदायी सेवाधर्म पुन्हा एकदा सुरू झाले आहे.

यांच्यावर झाले उपचार

  • पद्मश्री बाबा आमटे

  • तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस

  • आमदार प्रमिला टोपले

देशात दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकता या चार शहरांपेक्षा अधिक सुरक्षितस्थानी नागपूर आहे. देशाच्या राजधानीचे शहर होऊ शकते. मात्र, कोरोना काळात येथील आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. नागपुरातील मेडिकल हबची देशपातळीवर नव्हेतर जागतिक पातळीवर ओळख निर्माण व्हावी. जागतिक दर्जाची आरोग्य सेवा नागपुरात उपलब्ध व्हावी. यासाठी काही प्रमाणात डॉ. दंदे फाउंडेशन प्रयत्नशील आहे.
- डॉ. पिनाक दंदे, अध्यक्ष, डॉ. दंदे फाउंडेशन, नागपूर

(Equipped hospital in 15 days from the rubble building)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT