Explosives from Nagpur to demolish Twin Tower Secrets revealed from science fair sakal
नागपूर

Twin Tower : ट्विन टॉवर पाडण्यासाठी नागपुरातून स्फोटके !

विज्ञान मेळ्यातून उलगडले रहस्य; पहिल्याच प्रयोगात उपराजधानीचे योगदान

- राजेश प्रायकर

नागपूर : नोएडा येथील १३० मीटर उंच ३२ व २९ मजल्याचे ट्विन टॉवर पाडण्याचा देशातील पहिला प्रयोग ऑगस्टमध्ये करण्यात आला होता. माध्यमांनी या घटनेचे थेट प्रसारण दाखविल्यामुळे देशातील सर्वच नागरिकांनी हा थरार अनुभवला.

परंतु ही इमारत पाडण्यासाठी वापरलेली स्फोटके नागपुरातून मागविण्यात आले होते, हे रहस्य मंगळवारी विज्ञान मेळ्यातून उलगडले. ही इमारत पाडण्यासाठी ३ हजार ७०० किलोपेक्षा जास्त स्फोटके वापरण्यात आली होती.

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर नोएडातील अनधिकृत सुपरटेक एमरॉल्ड ट्विन टॉवर पाडण्यात आले होते. येथे ॲपेक्स ही ३२ मजल्यांची तर सेयॉन ही २९ मजल्यांची इमारत होती. या इमारतीत एकूण ८५० फ्लॅट होते.

ही इमारत सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट रुरकीच्या (सीबीआरआय) मार्गदर्शक तत्वानुसार पाडण्यात आली. अमरावती मार्गावरील विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आयोजित इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या निमित्ताने सीबीआरआयचे स्टॉल लागले असून बहुमजली इमारत पाडण्याचे मॉडेल लक्ष वेधून घेत आहे.

ही बहुमजली इमारत पाडण्याची तांत्रिक प्रक्रिया उलगडताना स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग डेटा सायन्सचे संशोधक डॉ. सुमनकुमार व डॉ. नविन निशान यांनी नागपुरातील एका स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीकडून इमारत पाडण्यासाठी स्फोटके मागविण्यात आल्याचे नमूद केले. परंतु त्यांनी कंपनीच्या नावाबाबत गोपनीयता बाळगली. सुरक्षेच्या कारणावरून कंपनीचे नाव सांगता येणार नाही, असे दोघांनीही स्पष्ट केले.

१०३ मीटर उंच बहुमजली इमारत स्फोटकांच्या सहाय्याने अवघ्या काही मिनिटांमध्ये जमीनदोस्त करण्याचा भारतातील हा पहिलाच प्रयोग होता. देशातील या पहिल्याच प्रयोगात उपराजधानीचे योगदानही मोठे असल्याची बाब यानिमित्ताने आज उघडकीस आली. देशातील विविध भागात असे आणखी काही प्रकल्प सीबीआरआयकडे आले असल्याचे त्यांनी नमूद केले.

हे प्रकल्प नेमके कुठले आहे, ही बाब सांगण्याचे त्यांनी टाळले, मात्र दिल्लीच्या जवळपास असल्याचे संकेत त्यांनी दिले. ही इमारत पाडताना आजूबाजूच्या अडीच मीटर परिसरात कंपणे तयार होणार, याबाबत आधीच तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले होते.

त्यामुळे ट्विन इमारतीच्या बाजूच्या इमारतींना आताच नव्हे तर भविष्यातही धोका निर्माण होऊ नये, यासाठी जमीन ‘कटऑफ’ करण्यात आले होते, असे त्यांनी नमूद केले. यापूर्वी केरळमध्ये चार इमारती भूईसपाट करण्यात आल्या होत्या. परंतु त्यासाठी जुनीच पद्धत वापरण्यात आली होती. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने देशात प्रथमच १०३ मीटर उंच बहुमजली इमारत पाडण्यात आल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

शेजारच्या इमारतींचे स्ट्रक्टरल विश्‍लेषण

ही इमारत पाडताना तयार होणाऱ्या कंपणामुळे अडीचशे मीटर परिसरातील इमारतींना धोका होता. परंतु बाजूच्या इमारतीचे स्‍ट्रक्चरला विश्‍लेषण करण्यात आले. परिसरातील इमारती पडण्याच्या स्थितीत तर नाही, याबाबतची पूर्ण माहिती घेण्यात आली. कंपणांच्या तीव्रतेचा अंदाज घेण्यात आला. त्यानंतरच इमारत पाडण्यात आल्याचे संशोधक डॉ. सुमनकुमार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT