The family in the confused society was expelled 
नागपूर

Video : तुम्ही तिकडच्या मुली करता न? मग भोगा आता; जातपंचायतीने उगारला सामाजिक बहिष्काराचा आसूड

प्रमोद काळबांडे

नागपूर : बहिष्कृत कुटुंबातील मुलीसोबत लग्न केले म्हणून जातपंचायतीने नागपुरातील एका कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकला आहे. यांच्यासह विविध कारणांनी पस्तीसेक लोकांनाही बहिष्कृत केले आहे. यात तरुण मुली, मुले, एवढेच काय तर दोन आणि चार वर्षांच्या चिमुकल्यांचाही समावेश आहे. या कुटुंबासोबत संबंध न ठेवण्याचा अलिखित फतवा काढला आहे.

नागपूर येथील शांतीनगर परिसरात गोंधळी समाजाची वस्ती आहे. गावांमध्ये भांडी विकून त्यांची गुजराण चालते. येथील दिलीप सूर्यभान इंगळे यांचा मुलगा सूरजचा विवाह वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील गोंधळी कुटुंबातील मुलीशी पार पडला. देवळी येथील काही कुटुंबे आधीच बहिष्कृत करण्यात आली होती. त्यांना त्यांच्या खानदानीचा पत्ता नाही, असे कारण दाखवून त्यांना जातपंचायतीने जातीबाहेर काढण्याचा आदेश दिला होता.

‘बहिष्कृत कुटुंबातील मुलीसोबत लग्न करता काय? दाखवतोच’, म्हणत शांतीनगरातील पंच आणि यवतमाळ जिल्ह्यातील एका पंचप्रमुखाने बहिष्काराचे तोंडी आदेश सर्वत्र दिले. कोणत्याही मंगल कार्यात त्यांना सहभागी करू, नका असे निरोप गोंधळी समाजाच्या राज्यभरातील वस्त्यांवर धाडले आहेत. आणखी वेगवेगळ्या प्रकरणात येथील पस्तीसेक लोक बहिष्कृत केले आहेत.

दिलीप यांची पत्नी द्रौपदीबाई, सूरजची पत्नी वर्षा यांच्यासह राहुल दिलीप इंगळे, पवन रमेश धुर्वे, गणेश प्रकाश ओगले यांचा समावेश आहे. सकाळ प्रतिनिधीपुढे त्यांनी व्यथित अंतःकरणाने आपबिती मांडली. कोणत्याही मंगल कार्यात आम्हाला बोलवत नाहीत. आमच्यात एखाद्या कार्यक्रमात टिळा लावण्याची परंपरा आहे. भर कार्यक्रमात ज्यांना टिळा लावला नाही, ते बहिष्कृत असल्याचे सिद्ध होते. मग त्यांच्याशी संबंध ठेवले जात नाहीत. एकप्रकारे त्यांना वाळीतच टाकले जाते.

शांतीनगरात नात्यातील एका कुटुंबातील लग्न आहे. त्या लग्नाची पत्रिका इतर समाजातील लोकांनाही दिली गेली; परंतु आम्हाला दिलेली नाही. याची विचारणा केली असता तुम्ही तिकडच्या मुली करता न? मग भोगा आता, असे सांगण्यात आले. आमच्यासह गोपाल आणि पारी वाकोडे, महादेव वाकोडे, पवन गंगावणे, रोहित इंगळे, विजय ओगले, साहेब आणि शांताबाई इंगळे, शकुंतला शिंदे, रवी आणि दीपा धुमाळ, राहुल आणि दुर्गा इंगळे यांनाही जातीबाहेर काढले आहे. पूजा टिल्लू ओगले यांच्या पतीचे निधन झाले. त्यांना दोन वर्षांचे बाळ आहे. प्रदीप इंगळे आणि दुर्गा यांना चार वर्षांचा चिमुकला आहे. या चिमुकल्यांसह त्यांनाही बहिष्कृत करण्यात आले आहे.

दहा हजार रुपये द्या मंग अंदर घेतो
पंच लोक प्रॉब्लेम क्रिएट करतात. आमाले दंड मारला. दहा हजार रुपये द्या मंग अंदर घेतो, नाहीतर राहा जातीबाहेर म्हणाले. 
- गणेश ओगले,
बहिष्कृत कार्यकर्ता, गोंधळी समाज

भिकाऱ्यासारखा जीव झाला आमचा
तीन वर्षांपासून आमाले जातीबाहीर टाकलं आहे. भिकाऱ्यासारखा जीव झाला आमचा. टिका लावत नायी. कार्यक्रमात येऊ देत नायी. 
- दिलीप सूर्यभान इंगळे,
जातपंचायतीने बहिष्कृत केलेले नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT