family of four young runners from Nagpur in trouble due to lockdown 
नागपूर

लॉकडाउनमुळे नागपूरच्या चार युवा धावपटूंचा परिवार अडचणीत

नरेंद्र चोरे

नागपूर  : परिस्थिती कशीही असो. तुमची मेहनतीची तयारी असेल, घरच्यांचा सपोर्ट असेल आणि गुरूचे पाठबळ असेल तर, तुम्हाला कुणीही यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. आकांक्षा सोदिया, आर्या कोरे, विदिता मेश्राम व जयश्री बोरेकर या शहरातील चार प्रतिभावान धावपटूंनी ते सिद्ध करून दाखविले. चौघींनीही अत्यंत विपरीत परिस्थितीत संघर्ष करून राज्य व राष्ट्रीयस्तरावर पदके जिंकून भविष्याच्या दृष्टीने आशा निर्माण केल्या आहेत.  त्यांच्याकडे "फ्युचर स्टार्स' म्हणून बघितले जात आहे. लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या या चारही खेळाडूंच्या परिवाराच्या पाठीशी समाज खंबीरपणे उभा राहिला तरच त्यांच्या पंखांना बळ येऊ शकते.

चारही धावपटू 13 ते 17 वर्षे वयागेटांतील आहेत. कुणाचे वडील ऑटोचालक आहेत, तर कुणाचे रोजमजुरी करणारे. कुणी झोपडीवजा घरात राहते, तर कुणी किरायाच्या घरात. परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी आपल्या खेळाडू मुलींना काहीही कमी पडू दिले नाही. मुलींनीही आतापर्यंत चांगली कामगिरी बजावून त्यांच्या कष्टाचे चीज केले.

जाणकारांच्या मते, चौघींचेही भविष्य उज्ज्वल आहे. फक्‍त गरज आहे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची, त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याची. सध्या लॉकडाउनमुळे हे चारही परिवार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. उदरनिर्वाहासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. दैनिक "सकाळ'ने परिवारातील खेळाडू व त्यांच्या पालकांच्या व्यथा जाणून घेतल्या असता, प्रत्येकीची कहाणी संघर्षमयी पण तेवढीच विदारक दिसून आली.
 

ऑटोचालकाची आकांक्षा


भगवती गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या 14 वर्षीय आकांक्षाचे वडील मुकेश हे ऑटोचालक व आई रक्षा ही गृहिणी आहे. नंदनवन परिसरात ऑटो चालवितात. मात्र, लॉकडाउनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून ऑटो घरीच आहे. या काळात एकाही पैशाची कमाई झाली नाही. जवळची जमापुंजी खर्च झाली. जनधन खात्यात दोनवेळा पाचशे रुपये आले. रेशनचे अन्नधान्य व त्या पैशावर सध्या सोदिया परिवारचा उदरनिर्वाह सुरू आहे. त्यांची मुलगी आकांक्षामध्ये कमालीचे टॅलेंट आहे. या चिमुकलीने अवघ्या 14 व्या वर्षी संगरूर (पंजाब) येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सहाशे मीटरमध्ये ब्रॉंझपदक जिंकून आश्‍चर्याचा सुखद धक्‍का दिला. शिवाय जिल्हा, विभागीय व राज्य स्पर्धेतही तिने चमकदार कामगिरी बजावली. त्यामुळे आकांक्षाकडून आईवडिलांना मोठ्या आशा आहेत.

करिअरविषयी गंभीर आर्या


पंडित बच्छराज व्यास विद्यालयाची विद्यार्थिनी असलेली आर्या कोरे ऍथलेटिक्‍समधील आणखी एक आशास्थान. प्रशिक्षक जितेंद्र घोरदडेकर यांच्या मार्गदर्शनात सराव करणाऱ्या 14 वर्षीय आर्याने अ. भा. विद्याभारती मैदानी स्पर्धेत 100 व 200 मीटरमध्ये सुवर्णपदके जिंकली. संगरूरमध्येही तिने छाप सोडली. राज्यातील इतरही स्पर्धा तिने गाजविल्या. आकांक्षाप्रमाणेच आर्याचीही आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. तिचे वडील (गोवर्धन) एका खासगी कंपनीत जॉब करतात, तर आई (हर्षा) घर सांभाळते. जेमतेम कमाई असूनही त्यांनी आपल्या लाडलीला काहीही कमी पडू दिले नाही. आर्यालाही आंतरराष्ट्रीय धावपटू बनून आईवडिलांसह शहराचे नाव रोशन करायचे आहे. आर्या करिअरप्रती गंभीर व प्रामाणिक असून, एरवी पहाटेच्या सुमारासच मैत्रिणींना प्रॅक्‍टिसला घेऊन जाते, असे तिच्या आईने सांगितले.
 

भविष्याची आशा विदिता


बच्छराज विद्यालयाच्या विदिता मेश्रामकडेही मोठ्या आशेने बघितले जात आहे. 14 वर्षांच्या या धावपटूने जिल्हा, विभागीय व राज्य पातळीवरील स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करून राष्ट्रीयस्तरावर झेप घेतली. विद्याभारतीच्या स्पर्धेतील 600 मीटर शर्यतीत तिने सुवर्णपदकाची कमाई केली. विदिताने रोहतक व संगरूर येथील राष्ट्रीय स्पर्धेतही राज्याचे प्रतिनिधित्व केले.चंद्रमणीनगर येथे राहणाऱ्या विदिताचे वडील (रवींद्र) हिंगणा येथील कंपनीत कामगार आहेत, तर आई (किरण) ही गृहिणी. लॉकडाउनमुळे कंपनी आतापर्यंत बंदच होती. एका आठवड्यापूर्वीच सुरू झाली. पगार कमी असल्यामुळे मेश्राम परिवार एका रूममध्येच किरायाने राहतो. आयुष्याचे एकेक दिवस काढताना त्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. शिवाय मुलीचे क्रीडाप्रेमही जपावे लागते.
 

जयश्रीला जाणीव परिस्थितीची


नंदनवन परिसरात राहणारी जयश्री बोरेकर ही घोरदडेकर यांची आणखी एक शिष्या. 17 वर्षीय जयश्रीनेही तीनवेळा राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेत 600 मीटर, 1500 व 3000 मीटर प्रकारांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व केले. जिल्हा, विभागीय व राज्य स्पर्धेतही तिने अनेक पदके जिंकलीत. जयश्रीच्या वडिलांचा (विजय) खासगी जॉब आहे. आई (अलका) गृहिणी आहे. लॉकडाउनमुळे तिचे वडीलही दोन महिन्यांपासून घरीच बसले आहेत. त्यामुळे जगायचे कसे, हा प्रश्‍न त्यांना पडला आहे. बोरेकर परिवारही किरायाने राहतो. त्यांना तीन मुली आहेत. जयश्रीची लहान बहीणही दर्जेदार ऍथलिट आहे. आईवडिलांच्या परिस्थितीची जयश्रीलाही जाणीव आहे. त्यामुळे ऍथलेटिक्‍समध्ये नाव कमावून व त्या आधारावर रेल्वे किंवा अन्य ठिकाणी नोकरी मिळवून आईवडिलांना आधार द्यायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT