farmer protest for water  sakal
नागपूर

Nagpur : तमिळनाडूला कावेरी नदीचे पाणी मिळावे...अंदमान एक्स्प्रेसच्या इंजिनवर चढले शेतकरी; 40 मिनिटे रोखून धरली रेल्वे

Protest for water kaveri river |तमिळनाडूला कावेरी नदीचे पाणी मिळावे यासह विविध मागण्यांसाठी तमिळनाडूच्या शेतकऱ्यांनी मुख्य रेल्वे स्थानकावर सोमवारी चांगलाच गोंधळ घातला.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : तमिळनाडूला कावेरी नदीचे पाणी मिळावे यासह विविध मागण्यांसाठी तमिळनाडूच्या शेतकऱ्यांनी मुख्य रेल्वे स्थानकावर सोमवारी चांगलाच गोंधळ घातला. शेतकरी चक्क प्लॅटफॉर्म दोनवर उभी असलेली गाडी क्रमांक १६०३२ अंदमान एक्स्प्रेसच्या इंजिनवर चढले. जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.

प्रारंभी शेतकऱ्यांना जेवण मिळाले नसल्याने गोंधळ घातला जात असल्याचे वाट होते. मात्र, शेतकऱ्यांनी दिल्लीतील आंदोलनात सहभागी न होऊ दिल्याने त्याचा वचपा नागपूर स्थानकावर काढला. त्यांनी तब्बल ४० मिनिटे रेल्वे रोखून धरली. शेतकरी प्रचंड आक्रमक होते. गळ्यात हिरवा दुपट्टा घालून त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे रेल्वे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. घोषणाबाजी करणारे एखाद्या संघटनेशी संबंधित असल्याचे प्रारंभी रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आले.

आंदोलक शेतकऱ्यांचा अंदमान एक्स्प्रेसमधूनच प्रवास सुरू होता. ते गाडीने नागपूर स्थानकावर आले. ही गाडी सकाळी १०.३० वाजता नागपुरात पोहोचली. शेतकऱ्यांनी गाडीच्या इंजिनचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला.

घोषणा देत काही जण इंजिनवर चढले. अचानक आंदोलनामुळे रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, लोहमार्ग पोलिसांनी धाव घेतली. हळूहळू आंदोलन तीव्र होत गेले. काहींनी प्रवाशांच्या डब्यातही शिरण्याचा प्रयत्न केला. पण, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना रोखले. माहिती मिळताच अधिकारीही पोहोचले. त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, ते ऐकून घेण्याच्या स्थितीत नव्हते. सुमारे ४० मिनिटे गोंधळाची स्थिती होती. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.

दिल्लीचा वचपा नागपूर स्थानकावर

शेतकरी नेते दिल्लीत आंदोलन करणार असल्याची गुप्त माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिस चेन्नईपासूनच त्यांचा पाठलाग करीत होते. रविवारी जीटी एक्स्प्रेसने दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना रविवारी नर्मदापूरम रेल्वे स्थानकावर रोखण्यात आले. यात जवळपास ६५ आंदोलनकर्ते शेतकरी होते.

नंतर गाडी पुढील प्रवासाला रवाना करण्यात आली. उतरवलेल्या आंदोलकांना तमिळनाडूला परत पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. प्रशासनाच्या सूचनेनुसार रेल्वेकडून अंदमान एक्स्प्रेसला अतिरिक्त डबा जोडून सर्वांना त्यातून रवाना करण्यात आले.

ही गाडी नागपूर स्थानकावर येताच आंदोलकांनी खाली उतरून घोषणाबाजी करून लक्ष वेधून घेतले. पोलिस व रेल्वे अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर शेतकरी शांत झाले. त्यांना पुन्हा त्याच गाडीत बसवून त्यांना रवाना करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी घडवलं सुसंस्कृतपणाचं दर्शन; चुलते श्रीनिवास पवार यांचे घेतले आशिर्वाद

Maharashtra Vidhan Sabha Voting Percentage Update: सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान

Maharashtra Assembly Election 2024: वरळीत शिवसेनेच्या उमेदवाराला मनसेचा पाठिंबा? व्हायरल पत्राने कार्यकर्त्यांमध्ये वातावरण तापलं! नेमकं काय घडलं?

UGC NET Exam December 2024: यूजीसीचं अधिसूचना जाहीर, जाणून घ्या परीक्षा वेळापत्रक

Maharashtra Assembly Election 2024 : Sachin Tendulkar आणि अजिंक्य रहाणेने बजावला मतदानाचा हक्क; कर्तव्य पुर्ण करण्याचे केले मतदारांना आवाहन

SCROLL FOR NEXT