Orange Fruit Farming  sakal
नागपूर

Orange Fruit Farming : कासवगतीने काम सुरू, शेतकरी हवालदिल

Orange Fruit Farming : नागपूर जिल्ह्यातील संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकरी फळगळतीमुळे मोठ्या संकटात आहेत, परंतु नुकसानीचे पंचनामे कासवगतीने होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जलालखेडा : नागपुरी संत्री असं नुसतं नाव जरी काढलं तरी अनेकांना या भागातील संत्रा फळाबद्दल मोठं आकर्षक वाटतं. परंतु, या संत्र्याचे उत्पादन करणारा शेतकरी मात्र सलग सातव्या वर्षी मेटाकुटीला आला आहे. त्याच मुख्य कारण म्हणजे संत्रा बागांमध्ये होत असलेली मोठ्या प्रमाणातील फळगळ. हीच अवस्था मोसंबीच्या पिकाची देखील आहे. मागील दोन महिन्यांपासून सततच्या व अति पावसामुळे ही फळगळ वाढत चालली आहे.

त्यामुळे संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. सुरुवातीला हजारो संत्रा फळांनी बहरलेल्या झाडांवर मात्र आता निम्यापेक्षाही कमी संत्रा शिल्लक असल्याचे पहायला मिळत आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश असताना देखील पंचनाम्याच्या कासवगतीमुळे गळलेल्या फळांची माती झाल्यावर पंचनामे होणार काय, असा प्रश्न फळ उत्पादक शेतकरी करीत आहेत.

नागपूर जिल्ह्यातील नरखेड व काटोल हे तालुके मोसंबी व संत्र्याच्या विक्रमी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. परंतु, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव व त्यातून होणाऱ्या फळगळतीमुळे या भागातील संत्रा व मोसंबी उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याने तसेच सरकारी पातळीवर काहीही उपाययोजना केल्या जात नसल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. ही अवस्थेत अंबिया बहाराच्या संत्रा व मोसंबीचे उत्पादन घेणाऱ्या सर्व तालुक्यांमधील संत्रा व मोसंबी उत्पादकांची आहे. शेतकऱ्यांनी अडचणीत खर्च करून ही काहीच होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

आरडाओरड झाल्यानंतर शासनाने नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनाला पाठविण्याचे आदेश दिले. पण पंचनाम्याचे काम कासवगतीने सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार गळलेली फळे वेचून फेकून दिली आहे. तर अनेकांनी झाडावरील फळांची विक्री केली आहे. अशात पंचनामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शेतात किंवा बागेत कहीच आढळले नाही तर शेतकरी हा मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.

नुकसानीचे पंचनामे करण्याची जबाबदारी कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व तलाठी यांच्याकडे देण्यात आली आहे. पण पंचनाम्यासाठी कोणते शिवार कोणाकडे आहे, याची ही माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. यामुळे शेतकरी यांच्या नुकसानीचे पंचनामे व्हावे यासाठी विविध कार्यालयाच्या उंबरठे झिजवीत आहे. पण त्यांना याची माहिती देण्याऐवजी टाळाटाळ करण्यात येत आहे.

नागपूर जिल्ह्यातील संत्रा व मोसंबी बागायतदार शेतकऱ्यांना मदतीकरिता पॅकेज जाहीर करण्याची गरज आहे. सन २०२२ पासून २०२४ पर्यंत सतत तीन वर्षांपासून फळ उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. बागायतदारांना नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी. अनेक शेतकऱ्यांच्या बागेत संत्रा व मोसंबीच्या फळांचा बागेत सडा पडला आहे. शासनाने सर्वेक्षण व पंचनामे करण्याचे आदेश दिले. सतत पाऊस सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी बागेतील फळाची उचल केली.

शासनस्तरावर निर्णय घ्यावा

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे रोख पीक संत्रा व मोसंबी असून काटोल व नरखेड तालुक्यातील २० हजार हेक्टरमध्ये लागवड आहे. इतर तालुक्यातील लागवड वेगळी आहे. कृषी विभागातर्फे कापूस व सोयाबीन क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून अनुदानाकरिता अर्जाची मोहीम सुरू आहे. शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या कार्यालयास रांगेत उभे राहावे लागत आहे. संयुक्त कुटुंबातील सदस्यांकडून संमती पत्रासोबत शंभर रुपयांच्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र मागणी करावी लागते.

ज्या शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी केली नाही त्या शेतकऱ्यांच्या यादीत नाव नाही. त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याकरिता तलाठी यांच्याकडून पेरापत्र करून माहिती द्यावी. त्यांना वंचित ठेवणे योग्य नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या या मागणीकडे शासन स्तरावर निर्णय घ्यावा, तेव्हाच जिल्ह्यातील शेतकऱ्यास आर्थिक मदत मिळू शकेल, अशी मागणी वसंत चांडक यांनी केली आहे.

संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकरी आधीच मोठ्या प्रमाणात त्यांच्या फळांची गळती झाल्याने अडचणीत आहे. अशात त्यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याची गरज असतांनी त्यांचा शिवार कोणाकडे आहे व ते केव्हा होणार याची साधी माहिती देखील नसल्याने तो विविध कार्यालयाच्या चकरा मारित आहे. पण त्याचे समाधान होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याची शासन स्तरावर दखल घेऊन नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

-अतुल पेठे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस ( शरदचंद्र पवार गट ), नरखेड तालुका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT