Father drowned his nine-month-old daughter 
नागपूर

'मैं कैसा बाप हुँ, अपने बच्ची के दुध का भी खर्चा नहीं उठा सकता', अस म्हणत तो मुलीला घेऊन घराबाहेर पडला अन्‌...

अनिल कांबळे

नागपूर : गेल्या चार महिन्यांपासून सोनू शेख हा बेरोजगार होता. त्यामुळे घरात आर्थिक चणचण होती. घरातील खर्चही भागत नसल्यामुळे तो चिडचिड करीत होता. लहान-सहान गोष्टीवरून वाद घालत होता. खिशात पैसे नसल्यामुळे तो जीवनाला कंटाळला होता. मुलीच्या दुधाचाही खर्च तो करू शकत नव्हता. आई-वडील आणि भावांच्या कमाईवर घर चालत होते. "मैं कैसा बाप हुँ जो अपने बच्ची के दुध का भी खर्चा नहीं उठा सकता' असे बोलून सोनू मुलीला घेऊन घराबाहेर पडला अन्‌... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू शेख (वय 30) हा खासगी वाहनावर चालक आहे. गुरुवारी दुपारी त्याचा पत्नी तबस्सूम (वय 22) सोबत वाद झाला. त्यामुळे सोनू संतापला. तो नऊ महिन्यांच्या मुलीला घेऊन शंकर साई मठ येथे आला. येथील ड्रममधील पाण्यात अलविनाला बुडवून ठार मारले. त्यानंतर सोनू याने बिअरची बाटली फोडली. फुटलेल्या बाटलीने गळ्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात तो पडला.

काही नागरिकांच्या प्रकार लक्षात आला. त्यांनी घटनेची माहिती सक्करदरा पोलिसांना दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमी सोनू याला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ड्रममधून अलविनाचा मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करून मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी खुनाचा व आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

पित्याची प्रकृती चिंताजनक

पत्नीसोबत क्षुल्लक वाद झाल्यानंतर रागाच्या भरात पित्याने नऊ महिन्यांच्या चिमुकलीला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून खून केला. त्यानंतर बिअरच्या बॉटलने स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी पित्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक आहे.

पत्नीने बोलण्याकडे दिले नाही लक्ष

पाच दिवसांपासून सोनू हा तणावात होता. त्याने पत्नी तबस्सूमला बुधवारी तयारी करून ठेवण्यास सांगितले. पत्नी आणि मुलीला घेऊन तो थेट फोटो स्टुडिओत पोहोचला. त्याने "फॅमिली फोटो' काढून घेतले. "फोटो संभालकर रखना. ये अपनी आखरी यादें होंगी' असे तो पत्नीला म्हणाला. परंतु, पत्नीने त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. 

मैं कैसा बाप हुँ..?

हाताला काम नाही. आई-वडील व भावांच्या भरवश्‍यावर घर चालत होते. स्वत: मुलीच्या दुधाचा खर्चही करता येत नव्हता. यामुळे काय करावे आणि काय नाही अशी चिंता सोनूला सतावत होती. मुलीच्या भविष्याची चिंता सतावत होती. मैं कैसा बाप हुँ... अस म्हणून तो स्वत:ला कोसत होता. मुलीच्या भविष्याच्या चिंतेतूनच त्याने असे कृत्य केले असावे, अशी शक्‍यता आहे. ही थरारक घटना भांडे प्लॉटमध्ये उघडकीस आली. या घटनेने रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. 

संपादन - नीलेश डाखोरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT