father molation fourteen year old girl in Nagpur 
नागपूर

'बाप-लेकी'च पवित्र नात कलंकित; बापाचा 14 वर्षीय मुलीवर बलात्कार

अनिल कांबळे

नागपूर : लॉकडाउनमुळे बेरोजगार झालेल्या बापाची नजर 14 वर्षांच्या सख्ख्या मुलीवर गेली. घरात कुणीही नसताना बापाने आपल्या वासनेची शिकार केली. ठार मारण्याची धमकी दिल्यामुळे मुलगी बापाचा शारीरिक अत्याचार सहन करीत होती. शेवटी तिने आईकडे आपिबती सांगितल्यामुळे बापाच्या पापाचा घडा फुटला. "बाप-लेकी'च्या पवित्र नात्याला कलंकित घडणारी घटना जरीपटका परिसरात उघडकीस आली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपी बापाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आठव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. तिला लहान बहीण आहे. आई-वडील दोघेही मजुरी करतात. वडीलाला दारूचे व्यसन असून, अनेकदा घरात मारझोड आणि तोडफोड करीत होता. तसेच घरात दारू पिऊन आल्यावर पत्नीशी भांडण करण्याच्या सवयीचा होता. त्याची वासनांध नजर 14 वर्षांच्या मुलीवर गेली. त्याच्यातील नराधाम जागृत झाला.

एका मध्यरात्रीला वडीलाने मुलीला पाठ दुखत असल्याचे सांगून मालीश करण्यास सांगितले. कामामुळे थकून आलेल्या वडीलाची सेवा करण्याच्या उद्देशाने मुलीने मालीश करून दिली. परंतु, बापाने तिला नको तेथे स्पर्श करीत चाळे केले. एकदा मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे ती घरी झोपलेली होती. घरी कुणीही नसल्यामुळे तिला बाम चोळून देण्याच्या बहाण्याने बापाने तिचे कपडे काढले. तिच्याशी अश्‍लील चाळे केले. तिने प्रतिकार केला असता आजारी मुलीला मारहाण केली. 

काही दिवसांपूर्वी पत्नी बाहेर गेली असता त्याने चक्‍क मुलीला रूममध्ये स्वतःसह कोंडून घेतले. तिला ठार मारण्याची धमकी दिली आणि शारीरिक संबंधाची मागणी केली. परंतु, मुलीने नकार देत आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बापाने तिचे हात ओढनीने बांधून शारीरिक संबंध प्रस्थापित करीत आपली वासना शमविली. तेव्हापासून ती एकाकी राहायला लागली. आईला सांगितल्यास विश्‍वास करणार की नाही? अशा द्विधा मनस्थितीत ती होती.

गेल्या काही महिन्यांपासून थेट मध्यरात्री तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची मालिका त्याने सुरू ठेवली. लॉकडाउन असताना घरात असलेला बाप दुपारी नेहमीच बलात्कार करीत होता. बापाचा त्रास असह्य झालेल्या मुलीने शुक्रवारी आईला बापाच्या पापाचा पाढा वाचत सर्व हकीकत सांगितली. आईने कपाळाला हात मारून घेतला. मन कठोर केले आणि लगेच पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करीत माहिती दिली. जरीपटका पोलिस घरी आले. त्यांनी नराधम बापाला अटक केली. 

लहान मुलीवरही होता डोळा

बलात्कार पीडित मुलीला 11 वर्षांची लहान बहीण आहे. नराधम बापाची वासनांध नजर तिच्यावरही गेली होती. मात्र, मोठ्या मुलीने बापाचा अत्याचार सहन केल्यामुळे लहान बहीण थोडक्‍यात वाचली. अन्यथा दारुड्या बापाच्या वासनेची लहान मुलगीही शिकार झाली असती, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

संपादन - नीलेश डाखोरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: कोथरूडमध्ये ७४ हजार मतांनी आघाडीचा विश्वास: चंद्रकांत पाटील

Sakal Podcast: चीनसमेार आता कमी होणाऱ्या लोकसंख्येचे संकट ते अर्जुन कपूरनं डिप्रेशनवर अशी केली मात

Panchang 20 November: आजच्या दिवशी विष्णुंना मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा

केंद्रांवरील हालचालींवर पोलिसांच्या ड्रोन अन्‌ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष! सोलापूर जिल्ह्यातील 11 मतदारसंघात 11000 पोलिसांचा बंदोबस्त, चहा-नाष्टा, जेवण जागेवरच

आजचे राशिभविष्य - 20 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT