नागपूर : शहरात गेल्या काही महिन्यांपासून अपघातांची मालिका सुरू असून ‘हिट ॲण्ड रन’चा प्रकार वाढला आहे. मात्र, शहरातील बहुतांश अपघात हे शहराच्या आजूबाजूला असलेल्या आऊटर रिंगरोडवर अपघात होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एकट्या हिंगणा पोलिस ठाण्यांतर्गंत गेल्या नऊ महिन्यांत २८ जण अपघातात ठार झाले तर शहरात अपघातात जीव गमावणाऱ्यांची संख्या २२२ आहे.आऊटर रिंगरोडवर दररोज जड वाहनांची गर्दी असते. यातून दररोज होणाऱ्या अपघातांची संख्येतही वाढ होत आहे. शहरात पाच परिमंडळात ३३ पोलिस ठाण्यांचा समावेश आहे.
यामध्ये परिमंडळ तीन सोडले तर इतर चारही परिमंडळातील काही पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध महामार्ग येतात. त्यामध्ये प्रामुख्याने हिंगणा, एमआयडीसी, सोनेगाव, वाडी, प्रतापनगर, कळमना, पारडी, मानकापूर, गिट्टीखदान, हुडकेश्वर, बेलतरोडी, वाठोडा, कोराडी, कपिलनगर, कळमना, पारडी, कामठी, जुनी कामठी या ठाण्यांचा समावेश आहे. गेल्या नऊ महिन्यांत या ठाण्यांतर्गत झालेल्या ३८३ अपघातांमध्ये २२२ जणांचा मृत्यू झाला.
यामध्ये सर्वाधिक २८ मृत्यू हे हिंगणा ठाण्यातील आहे. त्यापाठोपाठ हुडकेश्वरमध्ये २०, बेलतरोडीमध्ये १६, पारडीमध्ये १५ तर कळमनामध्ये १० जणांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आऊटर रिंगरोड हे मृत्यूचे सापळे होत चालल्याचे चित्र निर्माण झालेले आहे.
परिमंडळ निहाय मृत्यूची आकडेवारी
एक : हिंगणा - २८, एमआयडीसी - १२, वाडी - १२, सोनेगाव - ४,
प्रतापनगर- ९, बजाजनगर- ९, बजाजनगर- ३
दोन : सीताबर्डी - ९, धंतोली-२, अंबाझरी - ३, गिट्टीखदान - १३,
सदर - ६, मानकापूर - ५
तीन : गणेशपेठ - ४, लकडगंज - ४, पाचपावली - २, तहसील - ०,
शांतीनगर - ३, कोतवाली -१
चार ः हुडकेश्वर - २०, अजनी-९, सक्करदरा - ६, इमामवाडा - २,
बेलतरोडी-१६, नंदनवन-७, वाठोडा-११
पाच ः जरीपटका - ६, कपिलनगर-८, यशोधरानगर - ९, कोराडी-१४,
कामठी-४, जुनीकामठी-७, कळमना-१०, पारडी १५
३८३ अपघात ९ महिन्यांत
२२२ जणांनी गमावला जीव
६१ मृत्यू हुडकेश्वर, बेलतरोडी, पारडी, कळमना भागात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.