Nagpur Rain Update  Sakal
नागपूर

Nagpur Rain Update : पहिल्या पावसाची दणक्यात सलामी; नागपूर शहरात तासभर धो-धो

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक ज्याची चातकाप्रमाणे वाट पाहत होते, त्या मॉन्सूनने उशिरा का होईना आज उपराजधानीत धडाक्यात एंट्री केली. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह सायंकाळच्या सुमारास बरसलेल्या पहिल्या दणकेबाज पावसाने नागपूरकरांची पार दाणादाण उडविली.

पावसामुळे एकीकडे नागरिकांची तारांबळ उडाली, तर दुसरीकडे ऊन व उकाड्यापासून दिलासाही मिळाला. हवामान विभागाचा चार दिवस यलो अलर्ट असल्याने विदर्भात आणखी पाऊस अपेक्षित आहे.

गेल्या मंगळवारी मॉन्सून चोरपावलांनी चार दिवस अगोदरच पश्चिम विदर्भात दाखल झाला होता. परंतु लगेच कमजोर पडल्याने अपेक्षेप्रमाणे नागपूर व विदर्भात जोरदार पाऊस बरसला नाही. त्यामुळे बळीराजासह सारेच चिंतित होते. मात्र, सोमवारी अचानक वरुणराजाने हजेरी लावून साऱ्यांनाच सुखद धक्का दिला.

सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजांचा प्रचंड कडकडाट व मेघगर्जनेसह जवळपास तासभर बरसलेल्या धो-धो पावसाने शहरातील एकूणच वातावरण गारेगार केले. यंदाच्या मोसमातील या पहिल्या मॉन्सूनच्या पावसामुळे रस्त्यांवर जिकडेतिकडे पाणीच पाणी दिसत होते.

जागोजागी सखल भागांमध्ये पाणी तुंबले होते. त्यामुळे वाहनधारकांसह चाकरमान्यांनाही मनःस्ताप सहन करावा लागला. त्याचवेळी अनेकांनी पावसाचा आनंदही घेतला. शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत १८ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

उकाड्यापासून दिलासा

गेल्या अनेक दिवसांपासून नागपूर व विदर्भात उन्हाचे सौम्य चटके जाणवत होते. यादरम्यान नागपूरचा पारा ४१ व ४२ अंशांवर गेला होता. त्यामुळे नागपूरकर अक्षरशः घामाघूम झाले होते. मात्र आज पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाल्याने सर्वांनाच उकाड्यापासून दिलासा मिळाला.

बळीराजा खूश

मॉन्सूनच्या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांसह बळीराजाही खूश झाला. दणकेबाज पावसानंतर आता मशागत व पेरण्यांच्या कामालाही वेग येणार आहे. अर्धेअधिक मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकरी चिंतित होते. जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने साऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

झाडे पडली, बत्ती गुल

पावसामुळे शहरात नुकसानही झाले. शताब्दी चौक, बेसा, नंदनवन, महाल, पोलिस लाइन टाकळीसह ठिकठिकाणी विजांच्या तारांवर टिना, होर्डिंग्ज, झाडे व फांद्या पडल्याने अनेक भागांतील बत्ती गुल झाली.

त्यामुळे या भागातील नागरिकांना बराच वेळपर्यंत अंधारात राहावे लागले. जिल्हाधिकारी कार्यालयातही पाणी शिरल्याची तक्रार आल्याची माहिती, मनपाच्या अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. पावसामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांचीही धावपळ झाली.

चार दिवस यलो अलर्ट

प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात आणखी चार दिवस जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) दिला आहे. त्यामुळे या आठवड्यातही नागपूर व विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्ये दमदार मॉन्सूनसरी बरसण्याची दाट शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बन्ना शेख बनली रिया बर्डे...'त्या' बांगलादेशी पॉर्न स्टारबद्दल धक्कादायक खुलासा; राज कुंद्राशीही आहे कनेक्शन

Dharmaveer 2 : खोट बोलावं पण किती? धर्मवीर 2 मधला राज ठाकरेंवरचा 'तो' सीन होतोय प्रचंड ट्रोल

Latest Maharashtra News Live Updates : मराठा, ओबीसी समाजापाठोपाठ आता नाभिक समाजाचे आंदोलन

BB Marathi Voting Trends: सुरज टॉपवर पण सगळ्यात कमी मतं कुणाला? शेवटच्या आठवड्यात हे दोन सदस्य डेंजर झोनमध्ये

IND vs BAN 2nd Test : मोठे अपडेट्स : भारतीय संघ Kanpur स्टेडियमवरून हॉटेलमध्ये परतला; आजचा खेळ होण्यावर शंका

SCROLL FOR NEXT