मानोरा : आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने २५ आक्टोबरपासून पोहरादेवी येथे बुलडाणा येथील राजेश राठोड व जालना येथील तिघे असे चार जण बोगस घुसखोरी रोखण्यासाठी रद्द केलेली एसआयटी पुन्हा कार्यान्वित करण्यात यावे यासह विविध मागण्यासाठी ते अन्न व जलत्याग उपोषणाला बसले आहे.
आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहरादेवीत ओबीसी जनजागरण रॅलीला संबोधित करण्यासाठी १३ आक्टोबरला आले असता बुलडाणा येथील राजेश राठोड, जालना येथील श्याम राठोड,अमोल राठोड व सचिन राठोड यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.
त्यावेळी शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नसल्याने आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या मागण्या महायुती सरकारने मान्य करावे म्हणून बहुजन समाज बांधवांची काशी पोहरादेवी या येथे उपोषणास सुरवात केली आहे.
या आंदोलनासाठी समाजाच्या न्याय मागण्यासाठी आज चारही आंदोलन कर्ते सोबत दफन व कफन सोबत घेऊन आंदोलनात उतरले. वारे समितीच्या अहवाल नुसार त्या ५० लोकांनी जात प्रमाणत्र व जातींचे व्हलिडिटी घेणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे.
व्हलिडिटी देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे. रद्द झालेली एस आय टी पुन्हा कार्यान्वित करण्यात यावी, आ राजेश राठोड यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात यावे मागण्या करिता पोहरादेवी येथे बुलडाणा येथील राजेश राठोड, जालना येथील श्याम राठोड, अमोल राठोड व सचिन राठोड उपोषणास बसणार आहेत.
आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी अनेकांची हजेरी
यावेळी महंत सुनील महाराज, संजय महाराज, डॉ सुभाष राठोड, डॉ श्याम जाधव, डॉ मधुकर नाईक, डॉ तुषार राठोड, नामा बंजारा, अभय चव्हाण, राजू रत्ने, प्रा सरदार राठोड, अभिजित राठोड, दिलीप चव्हाण, विनोद राठोड, मोहन राठोड, टी. व्ही राठोड,केशव महाराज
राष्ट्रसंत डॉ रामराव महाराज यांचे पुण्यतिथी निमित्त पोहरादेवी येथे निर्धार सभा घेणार.तसेच समाजाच्या मागण्या मान्य न करणाऱ्या शासनातील मंत्री, आमदार यांना २९ आक्टोबरनंतर तांडा बंदी व नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पोहरादेवी ते नागपूर पायदळ मोर्चा काढणार.
- सुनील महाराज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.