fortified rice sakal
नागपूर

Fortified Rice : प्लास्टिकचा नव्हे, ‘फोर्टिफाइड’ तांदूळ; लाभार्थ्यांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे; अन्न पुरवठा विभागाचे स्पष्टीकरण

अशोक डाहाके

केळवद : शिधापत्रिका ई-केवायसी होत नसल्याने आधीच त्रस्त असलेल्या कार्डधारकांना आता स्वस्त धान्य दुकानातून मिळणारा तांदूळ हा प्लास्टिकचा असल्याची अफवा सर्वत्र पसरली आहे. हा तांदूळ खाण्यावरून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. स्वस्त धान्य दुकानात मिळणारा तांदूळ ‘फोर्टिफाइड’ असून खाण्यास उपयुक्त असल्याचा दावा अन्न पुरवठा विभागाने केला आहे.

सावनेर तालुक्यातील अन्न व पुरवठा विभागाकडून अंत्योदय अन्नयोजना, तथा प्राधान्यक्रम कुटुंब शिधापत्रिकाधारकांना तालुक्यातील ११८ स्वस्त धान्य दुकानातून तालुक्यातील अंत्योदय लाभार्थी ५,३०३ तर प्राधान्य लाभार्थी ४२, ८५० असे एकूण ४८,१५३ शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ वितरित करण्यात येतात.

सद्या ऑगस्ट महिन्यात वितरित करण्यात येणाऱ्या स्वस्त धान्य दुकानातील अंत्योदय लाभार्थ्यांना १, ३२६ क्विटंल तर प्राधान्य लाभार्थांना ६, ८०० क्विटंल, असा एकूण ८,१२६ क्विटंल फोर्टिफाइट तांदूळ वितरित करण्यात येत आहे. मात्र हा तांदूळ प्लास्टिकचा असल्याची अफवा तालुक्यात सर्वत्र पसरली आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तथा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्न पुरवठा विभागाकडून मोफत तांदूळ वितरित करण्यात येतो. यात सावनेर तालुक्यात ८,१२६ क्विटंल तांदूळ वितरित करण्यात येतो.

यात प्लास्टिक तांदूळ वितरित करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. फोर्टिफाइड तांदूळ हलका असून तो पाण्यात तरंगत असल्याने तो प्लास्टिकचा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र सावनेर तालुका अन्न पुरवठा विभागाने फोर्टिफाइड तांदूळ हा प्लास्टिकचा नसून तो खाण्यास पोषणयुक्त असल्याचे आवाहन तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातील शिधापत्रिकाधारकांना करण्यात आले आहे.

काय आहेत फोर्टिफाइड तांदूळ?

फोर्टिफाइड तांदळात सुक्ष्म पोषक तत्वे, पोटव्हिटॅमिन व खनिजांची मात्रा कृत्रिमरित्या मिसळलेली असते. प्रथम तांदळाची भुकटी तयार केली जाते. त्यात सर्व पोषणतत्वे मिसळली जातात. या मिश्रणाला पुन्हा तांदळाचा आकार दिला जातो. यालाच फोर्टिफाइड तांदूळ असे म्हणतात. फोर्टिफाइड तांदळाला अतिरिक्त पोषण तत्वांनी समृद्ध करण्यात येते. जेणेकरुन शरीराला आवश्यक पोषक तत्वाची कमतरता दूर करण्यासाठी मदत मिळते.

असे आहे प्रमाण

साधा तांदूळ१०० किलो असेल तर,९९ किलो साधा तांदूळ यात १ किलो फोर्टिफाइड तांदूळ मिसळला जातो. याच्या मिश्रणाला फोर्टिफाइट तांदूळ असे म्हटले जाते.राज्यातील जिल्ह्यांना हा फोर्टिफाइड प्रक्रियायुक्त तांदूळ पुरवण्याची जबाबदारी विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याला देण्यात आली असून २०१८-१९ पासून भामरागड येथे या तांदळाचा ‘पायलट प्रोजेक्ट’ सुरु झालेला आहे. मार्च २०२४ पासून संपूर्ण नागपूर जिल्ह्यात वितरण सुरु आहे.

तांदळात दिसणारे वेगळे कण हे ‘फोर्टिफाइड’ तांदळाचे आहे. यात मिनरल व विटामिन आहे. हा तांदूळ पोष्टिक आहे. सर्व वयोगटातील महिला-पुरुषाकरिता हा तांदूळ गुणकारी आणि आजारावर फायदेशीर आहे. या तांदळात प्लास्टिक असल्याची अफवा आहे. यावर कुणीही विश्वास ठेवू नये.

-अनिल बन्सोड, उपायुक्त, पुरवठा विभाग, नागपूर

तांदळात पोषणमूल्ये असून यात तांदळात आर्यन, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन बी१२, बी ६, व्हिटॅमिन ए, झिंक व्हिटॅमिन असून यामुळे अशक्तपणा दूर होतो. लालपेशीची कमतरता कमी करते. गर्भाचा विकास, नवीन रक्तपेशी तयार करते. मज्जासंस्था व मेंदुची कार्यक्षमता वाढवते, या फोर्टिफाइड तांदुळ गुणकारी असल्याने याचे आरोग्यास सेवन उपयुक्त आहे.

-विवेक सीरीकर, अन्न पुरवठा निरीक्षक, अन्न पुरवठा विभाग, सावनेर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Disqualification Case: शिवसेना- राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी अखेर मिळाला मुहूर्त; या तारखेला होणार सुनावणी

Latest Marathi News Updates : धारावीमध्ये शेकडो नागरिक रस्त्यावर; तणावाची स्थिती

Cha.Sambhajinagar: मराठवाड्यात काँग्रेस असणार मोठा भाऊ? या जागांवर केला दावा

Tirumala Tirupati Laddu: 'तिरुपती'च्या लाडूमध्ये आढळले जनावराची चरबी अन् माशांचं तेल; 'या' पद्धतीने ओळखा तूपाची शुद्धता

Bigg Boss Marathi 5 Voting Trends: सुरजला जान्हवीने दिली टक्कर तर 'या सदस्याला मिळालेत सगळ्यात कमी वोट्स; कोण होणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT