foundation of new Nagpur will laid from thirteen hundred crores nmrda sakal
नागपूर

साडेतेराशे कोटींतून रचणार नवीन नागपूरचा पाया

‘एनएमआरडीए’च्या प्रस्तावाला मंजुरी; २४ गावांमध्ये एक हजारावर किमीचे जलवाहिनी, सिवेज लाइनचे जाळे

- राजेश प्रायकर

नागपूर : अनेक वर्षांपासून नवीन नागपूरची संकल्पना रखडली होती. परंतु, आता ही संकल्पना अंमलात आणण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे संकेत नुकतेच नगर विकास विभागाने दिले. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एनएमआरडीए) १ हजार ३५३ कोटींच्या विकास कामांना नगर विकास विभागाने मंजुरी दिली. यात एक हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या जलवाहिन्या व सिवेज लाइनचे जाळे टाकण्यात येणार आहे. या विकास कामाच्या माध्यमातून नवीन नागपूरचा पाया रचला जाणार असल्याचे समजते.

गेल्या काही वर्षांमध्ये नागपूर शहर चांगलेच वाढले. शहराच्या सीमेवरील बेसा, बेलतरोडी, पिपळा, बहादुरा, कामठी, कोराडी, वाडी, हिंगणा, बुटीबोरीपर्यंत लहान मोठे शहर व खेड्यांचेही आता शहरीकरण झाले. त्यामुळे नवीन नागपूरबाबतही चर्चा सुरू झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असलेली ही चर्चा आता प्रशासकीय स्तरावर प्रत्यक्ष कार्यवाहीत रुपांतरीत होताना दिसत आहे. शहराच्या सभोवताल असलेली खेडी, शहरांच्या नियोजित विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनएमआरडीएची स्थापना केली.

जवळपास साडेसातशे खेड्यांचा एनएमआरडीए क्षेत्रात समावेश करण्यात आला. एनएमआरडीएने या क्षेत्रात बांधकाम नियमावली लागू केली आहे. आता या क्षेत्राच्या विकासासाठीही एनएमआरडीए आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी पावले उचलली आहेत. नुकताच नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी नागपुरात येऊन गेल्या. त्यांनी शहराच्या विकासासंबंधात बैठक घेतली होती. केंद्र सरकारच्या अमृत-२ या योजनेंतर्गत एनएमआरडीएच्या सेक्टर साऊथ बी सेक्टरमध्ये समावेश असलेली १३ व ईस्ट ए सेक्टरमध्ये समावेश असलेल्या ११ गावांमध्ये विकास कामे करण्यास मंजुरी दिली. या प्रकल्पाचा लाभ ८१ चौरस किमी क्षेत्रातील नागरिकांना होणार आहे.

या प्रकल्पाअंतर्गत साऊथ बी सेक्टरमध्ये ५६५.२५ कोटींच्या जलवाहिनीचे जाळे टाकण्यात येणार आहे. एकूण ५६५ किमीचे जलवाहिनीचे जाळे पसरविण्यात येणार आहे. यात साउथ-बी मध्ये २२०.९० कोटी तर ईस्ट एमध्ये ३४४.३६ कोटी खर्च करण्यात येणार आहेत. याशिवाय ७८८.८७ कोटींचा सिवेज लाइनचे जाळे पसरविण्याचाही प्रकल्प आहे. दोन सांडपाणी प्रक्रिया केंद्रासह ५२२ किमी अंतराच्या सिवेज लाईन तयार करण्यात येणार आहे. यातील साऊथ बीमध्ये २२० तर ईस्ट एमध्ये ३०२ किमीच्या सिवेज लाइनचे जाळे तयार करण्यात येणार आहे.

साडेआठ लाख लोकांना लाभ

सेक्टर साऊथ बी तसेच ईस्ट एमध्ये एकूण २४ गावांचा समावेश आहे. ८१ चौरस किलोमीटर क्षेत्रात सिवेज व जलवाहिनीचे जाळ पसरविण्यात येणार आहे. या क्षेत्रातील ८ लाख ५० हजार नागरिकांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे या भागात रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात रहिवासी क्षेत्र तयार होऊन प्रमुख नागपूर शहरातील ताणही कमी होण्यास मदत होणार आहे.

प्रकल्पात या गावांचा समावेश

सेक्टर साऊथ - बी

बेसा, बेलतरोडी, पिपळा, घोगली, हुडकेश्वर खुर्द, शंकरपूर, गोटाळपांजरी, वेळाहरी, रुई, वरोडा, पांजरी, किरणापूर, कन्हानळगाव या गावांचा समावेश आहे.

सेक्टर ईस्ट- ए

पांढुर्णा, तरोडी खुर्द, तरोडी बुजूर्ग, बीडगाव, कापसी खुर्द, पोवारी, अड्याळी, विहिरगाव, गोनी सिम, खरबी, बहादुरा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचा विस्तृत आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अमृत-२ योजनेंतर्गत शहर सिमेवरील एनएमआरडीए क्षेत्रात सिवेज लाइन व जलवाहिनीचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. हा प्रकल्प नवीन नागपूरचा पाया रचणारा ठरणार आहे. येत्या नोव्हेंबरपर्यंत तांत्रिक मंजुरी व निधीची तरतूदही होईल.

- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त, एनएमआरडीए.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT