Nagpur Rain Update Sakal
नागपूर

Nagpur Rain Update : काही भागांत दमदार तर कुठे दांडी; आजपासून चार दिवस यलो अलर्ट

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वरुणराजाने पुन्हा काही भागांत दमदार हजेरी लावली. तर कोरडेठाक वातावरण असल्याने यंदा टिळा लावण्यापुरताच पाऊस येत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास अनेक भागांत अर्धा तास बरसलेल्या जोरदार सरींमुळे वातावरण आल्हाददायक बनले.

प्रादेशिक हवामान विभागाचा शुक्रवारपासून चार दिवस यलो अलर्ट असल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी ‘मिस कॉल’ दिल्यानंतर गुरुवारी नागपूरकरांची इच्छा पूर्ण झाली. मात्र पाऊस अर्धा तासच राहिला.

काही भागांत विशेषतः पूर्व शहरात जोरदार बरसला. त्यामुळे घराबाहेर पडलेल्या वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांना आडोशाचा आधार घ्यावा लागला. शिवाय रेनकोट व छत्र्याही बाहेर निघाल्या. पावसामुळे जागोजागी खोलगट भागांमध्ये पाणी साचले होते.

दुपारी ढगाळ वातावरण असूनही वरुणराजाने हुलकावणी दिली. जोरदार पावसासाठी सध्या अनुकूल वातावरण असल्यामुळे शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. विदर्भात वर्धा (२६ मिलिमीटर), ब्रह्मपुरी (२३.६ मिलिमीटर) आणि अमरावती (११.६ मिलिमीटर) येथेही दमदार पाऊस बरसला.

शेतकऱ्यांना मुसळधारेची प्रतीक्षा

भारतीय हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा अधिक (१०६ टक्के) पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र मॉन्सूनने आतापर्यंत तरी निराशाच केली आहे. केवळ पश्चिम विदर्भातच समाधानकारक पाऊस बरसला आहे.

जिल्ह्यात पिके जगविण्यापुरताच पाऊस झाला आहे. लवकरच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे त्यांची ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाअभावी जमिनीतील पाण्याची पातळी वाढलेली नाही. शिवाय जिल्ह्यातील धरणांचीही तशीच स्थिती आहे.

दीड महिन्यात केवळ दीडशे मिमी पर्जन्यवृष्टी

नागपुरात १ जून ते ११ जुलैपर्यंत दीड महिन्यांत केवळ १५० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यात जून महिन्यातील ८७ मिलीमीटर आणि जुलैमधील ७३ मिलीमीटरचा समावेश आहे.

उल्लेखनीय म्हणजे, जुलैमध्ये सरासरी ३४७ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा पावसाला जोर नसल्यामुळे आतापर्यंत २५ टक्केही पाऊस झाला नाही. ४० दिवसांत फक्त चारच दिवस चांगला पाऊस पडला. मात्र जुलैच्या उत्तरार्धात व त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT