Four members of same family end lives in Nagpur 
नागपूर

Nagpur : नागपूर हादरलं! सेवानिवृत्त शिक्षकासह एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन; परिसरात एकच खळबळ

रोहित कणसे

नागपूर : एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेत आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील मोवाड गावात समोर आली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून गाव आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विजय पचोरी (सेवानिवृत्त शिक्षक), पत्नी मालाबाई (गृहिणी), मुले दीपक आणि गणेश अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुर जिल्ह्यामधील नरखेड तालुक्यातील मोवाड गावात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली . या कुटुंबाने एकत्रीत टोकाचे पाऊल उचल्ल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत असून भयंकर घटनेने गावात भितीचे वातावरण पसरले आहे. विजय पचोरी त्यांच्या पत्नी मालाबाई पचोरी आणि दीपक व गणेश पचोरी अशी मृतांची नावे आहेत. विजय पचोरी हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत, तर त्यांच्या पत्नी गृहिणी असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान या बाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या संपूर्ण कुटुंबाने इतके टोकाचे पाऊल का उचचले असावे? यामगील नेमके कारण काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलीस याबाबतचा तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nithin Kamath: भारतीय लोक श्रीमंतांचा द्वेष का करतात? नितीन कामथ यांनी सांगितलं कारण; म्हणाले, आपला समाज...

पुणे सोलापूर महामार्गावर विश्रांतीसाठी थांबलेल्या वाहनातील डिझेल चोरीच्या घटनांमध्ये वाढ

"ती गृहिणी म्हणजे तिला किंमत नाही हे चुकीचं" नवरात्रीनिमित्त स्नेहल तरडे यांचं डोळ्यात अंजन घालणारं वक्तव्य

धक्कादायक घटना! CM एकनाथ शिंदेंच्या बंदोबस्ताला जाताना मोठा अपघात, १२ पोलीस जखमी

Fake SBI Branch: बनावट बँक शाखेचा भांडाफोड; SBIच्या नावे गावकऱ्यांची फसवणूक, लाखो रुपयांना गंडा

SCROLL FOR NEXT