नागपूर : मुलीला भूताने झपाटल्याचे सांगून दुलेवाले महाराज नावाने ओळखल्या जाणाऱ्या भोंदूबाबाने मुलीवर सहा महिने बलात्कार केला, तर देवाच्या प्रकोपाने मृत्यू होण्याची भीती दाखवून मुलीची आई, आजी व मामीवरही बलात्कार केल्याची घटना पारडीत उघडकीस आली आहे. पोलिसांनी भोंदूबाबाला अटक केली असून त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. धमेंद्र विठोबा निनावे ऊर्फ दुलेवाले महाराज बाबा (वय ५० रा. अम्बेनगर,पारडी),असे अटकेतील भोंदूबाबाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही अल्पवयीन असून शिक्षण घेत आहे. तिचे वडील खासगी कंपनीत आहेत. धमेंद्र हा पीडित मुलीच्या वडिलांचा मित्र आहे. १७ मे रोजी तो पीडित मुलीच्या घरी आला. तुमच्या घरात भूतबाधा झाली आहे. मोठे संकट येणार आहे. वेळीच पूजा न केल्यास भूत अनेकांचा बळी घेईल, अशी भीती दाखवली. पीडितेचे वडील घाबरले. त्यांनी धमेंद्र याला उपाय विचारला. २१ दिवसांची पूजा करावी लागेल,असे धमेंद्र याने पीडित मुलीच्या वडिलांना सांगितले. धमेंद्र याने २१ दिवसांची पूजा केली. पूजा केल्यानंतरही भूतबाधा संपली नसून मुलीवर भुताचा अधिक प्रभाव असल्याचे त्याने पीडित मुलीच्या वडिलांना सांगितले. भूत उतरविण्याच्या बहाण्याने तो मुलीला निर्जनस्थळी घेऊन गेला आणि बलात्कार केला. पूजेच्या बहाण्याने त्याने पीडित मुलीसह आईवरही अत्याचार केला. भूतबाधा उतरविण्याच्या बहाण्याने त्याने पीडित मुलीला पाच महिने घरी ठेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो दोघींना घेऊन डोंगरगड येथे गेला. तेथील हॉटेलमध्ये दोघींवर अत्याचार केला. चंद्रपूर येथेही त्याने दोघींचे लैंगिक शोषण केले.
पीडितेची मामी, आजीवरही अत्याचार -
पीडित मुलीची मामी व आजीवरही त्याने अत्याचार केला. एक लाख रुपये खंडणी मागीतली. अत्याचार वाढत गेल्याने पीडित मुलीने नातेवाइकांसह पारडी पोलिस स्टेशन गाठून तक्रार केली. पोलिसांनी अत्याचार, जादुटोणा प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून धमेंद्र याला अटक केली. त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.