Booster Dose sakal
नागपूर

मोफत बूस्टर डोस अभियान होणार बंद; केवळ १५ दिवस शिल्लक

केंद्र सरकारने सुरू केलेला मोफत बूस्टर डोस अभियान महिन्याअखेर बंद होणार आहे.

राजेश प्रायकर

केंद्र सरकारने सुरू केलेला मोफत बूस्टर डोस अभियान महिन्याअखेर बंद होणार आहे.

नागपूर - केंद्र सरकारने सुरू केलेला मोफत बूस्टर डोस अभियान महिन्याअखेर बंद होणार आहे. केवळ पंधरा दिवस शिल्लक असल्याने दोन्ही डोस घेऊन सहा महिने झालेल्या नागरिकांनी तत्काळ अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. आतापर्यंत शहरात साडेतीन लाखावर नागरिकांनी बूस्टर डोस घेतला.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये १८ वर्षावरील सर्वांच्या कोविड प्रतिबंधात्मक बूस्टर डोसच्या लसीकरणासाठी आता फक्त शेवटचे १५ दिवस शिल्लक आहेत. केंद्र सरकारने ७५ दिवस नि:शुल्क बूस्टर डोस अभियान राबविण्याचा निर्णय घेतला होता. येत्या ३० सप्टेंबरला ७५ दिवस पूर्ण होणार आहे. त्यामुळे निःशुल्क डोस अभियान बंद होणार आहे.

मनपा आणि शासकीय रुग्णालयाच्या केंद्रांवर नि:शुल्क बूस्टर डोस उपलब्ध आहे. १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी कॉर्बेव्हॅक्स लस सुद्धा उपलब्ध आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण आवश्यक आहे. स्वत:च्या आरोग्यासह इतरांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही लसीकरण महत्वाचे आहे. त्यामुळे लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या आणि दुसऱ्या डोसपासून सहा महिने पूर्ण झालेल्या पात्र व्यक्तीने लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

१७ लाख पात्र नागरिक

आरोग्य विभागातर्फे आतापर्यंत एकूण ४३,३६,५७७ कोविड प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात आल्या. यात पहिला डोस घेणारे २१,९२,१३८ तसेच दुसरा डोस घेणारे १७,७८४२४ नागरिकांचा समावेश आहे. विभागाने आपले निर्धारित लक्ष प्राप्त केले असून उर्वरित नागरिकांनी सुद्धा बुस्टर डोस घेऊन स्वत:ला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे

या केंद्रांवर सुरू आहे लसीकरण

झोन लसीकरण केंद्र, लक्ष्मीनगर, कामगार नगर यूपीएचसी, कामगार कॉलनी, सुभाष नगर, जयताळा यूपीएचसी, जयताळा, खामला यूपीएचसी, खामला नागपूर, धरमपेठ फुटाळा यूपीएचसी, अमरावती रोड, सदर रोग निदान केंद्र, सुदामनगर यूपीएचसी, पांढराबोडी हिल टॉप, केटीनगर यूपीएचसी, हजारीपहाड यूपीएचसी, डिक दवाखाना, धरमपेठ, इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर.

हनुमाननगर मानेवाडा यूपीएचसी, शाहू नगर, नरसाळा यूपीएचसी, हुडकेश्वर यूपीएचसी, धंतोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (फक्त कोवॅक्सिन), बाबुलखेडा यूपीएचसी, मानवता हायस्कूलजवळ, आयसोलेशन हॉस्पिटल, इमामवाडा, एम्स हॉस्पिटल, मिहान (कोवॅक्सिन + कोविशिल्ड) नेहरूनगर बिडीपेठ युपीएचसी, ताजबाग यूपीएचसी, नंदनवन यूपीएचसी, दर्शन कॉलनी, दिघोरी यूपीएचसी, जिजामातानगर.

गांधीबाग महाल रोगनिदान केंद्र, भालदारपुरा यूपीएचसी, मेयो हॉस्पिटल (फक्त कोविशिल्ड), मोमिनपूरा यूपीएचसी, डागा हॉस्पिटल. सतरंजीपुरा मेहंदीबाग यूपीएचसी, कुंदनलाल गुप्ता यूपीएचसी, जगनाथ बुधवारी यूपीएचसी, शांतीनगर यूपीएचसी, सतरंजीपूरा यूपीएचसी.

लकडगंज डिप्टी सिग्नल यूपीएचसी, संजयनगर, पारडी युपीएचसी, भरतवाडा युपीएचसी, विजयनगर, हिवरीनगर यूपीएचसी. आशीनगर पाचपावली यूपीएचसी लष्करीबाग, कपिलनगर यूपीएचसी, शेंडेनगर यूपीएचसी, शेंडेनगर, बंदे नवाज यूपीएचसी, गरीब नवाज यूपीएचसी, आंबेडकर हॉस्पिटल, कामठी रोड (फक्त कोवॅक्सिन) मंगळवारी गोरेवाडा यूपीएचसी, झिंगाबाई टाकळी यूपीएचसी, झिंगाबाई टाकळी जुनी वस्ती, इंदोरा यूपीएचसी, बेझनबाग, नारा यूपीएचसी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Chh.Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT