Nagpur Crime  sakal
नागपूर

Nagpur Crime : शिवीगाळ केल्याने प्रेयसीकडे बोलवून पावशीने चिरला गळा,गुन्हेगार मित्राचा खून : पारडीतील घटनेने खळबळ

Nagpur Crime : शिवीगाळ केल्याच्या रागातून नागपुरात एका मित्राने दुसऱ्या मित्राचा खून केला. आरोपीने प्रेयसीकडे बोलावून गळ्यावर वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गुन्हेगार मित्राने शिवीगाळ केल्याने त्याला प्रेयसीकडे बोलवून, पावशीने गळ्यावर करीत वरच्या माळ्यावर फेकून दिले. ही घटना पारडीतील शिव-शंभूनगरनगरात शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली. जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पारडी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली.

लिलाधर रवी टंडन (वय २४, रा. भवानीनगर, पारडी) असे मृताचे नाव असून संजय दशरथ ठाकरे (वय ४०, रा. गुरूदेव पानठेल्या जवळ, भवानीनगर, पारडी) असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिलाधर आणि संजय हे दोघेही चांगले मित्र होते. दोघेही मजुरीचे काम करून एकत्र मद्यप्राशन करायचे.

शुक्रवारी (ता.४) संजय ठाकरे आपल्या परिवारासह घरी असताना लिलाधर टंडन तेथे आला. त्याने पत्नी आणि मुलांसमोर संजयला दारू पिण्याबाबत विचारणा केली. त्याने नकार देताच, लिलाधरने त्याला शिवीगाळ केली आणि तिथून निघून गेला. यामुळे संजयच्या मनात राग निर्माण झाला.

शनिवारी (ता.५) संजय मोपेड घेऊन लिलाधरच्या घरी गेला. त्याला दारू पिण्यासाठी सोबत घेऊन शिव-शंभूनगरनगरात पूजा शेंडे नामक प्रेसयीकडे घेऊन आला. तेथे तिला पाणी मागून दोघेही घराच्या टेरेसवर दारू पिऊ लागले. संजयने त्याला कुटुंबासमोर शिवीगाळ का केली? असा प्रश्‍न विचारताच, लिलाधरला कुणकूण लागल्याने तो तेथून निघून जाऊ लागला.

मात्र, लिलाधर पायऱ्यावर आला असता, संजय त्याच्या मागे-मागे गेला आणि त्याच्या मानेवर पावशीने वार केले. त्यामुळे लिलाधर खाली पडला. मात्र, संजयने त्याला ओढून टेरेसवर नेले. त्यानंतर तेथून लाथ मारून त्याला खाली फेकले. यानंतर लिलाधरच्या कुटुंबीयांना त्याचा अपघात झाल्याची माहिती दिली.

लिलाधरला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये त्याचा मानेवर वार असल्याचे आढळून आले.

आरोपी-मृतक दोघेही गुन्हेगार

लिलाधर आणि संजय हे दोघेही गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. लिलाधर याच्यावर हल्ला करणे, चोरी आणि इतर गुन्हे दाखल आहे. याशिवाय संजय २०१४ साली केलेल्या खुनाच्या आरोपाखाली तीन वर्ष शिक्षा भोगून तीन महिन्यांपूर्वीच आलेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT