Gang arrested for trying to defraud a bank 
नागपूर

बापरे... चक्‍क बॅंकेलाच गंडविण्याचा प्रयत्न, तोही एवढ्या कोटींनी...

अनिल कांबळे

नागपूर : चोरटे कसे, कुठे कुणाला गंडवतील याचा काही नेम नाही. छोट्या मोठ्या चोऱ्या करून आपली गरज भागविणाऱ्या चोरट्यांची नजर आता चक्‍क बॅंकांवर गेली आहे. असाच एक प्रकार नुकताच उघडकीस आला. भारतीय स्टेट बॅंकेच्या शाखेत मोठ्या रकमेचा बनावट धनादेश वटविण्याच्या नावाने तिघे बॅंकेत दाखल झाले आणि पुढील प्रकार घडला. 

एका उद्योजकाच्या खात्यातून बनावट धनादेशाद्वारे तीन कोटींची रक्‍कम काढण्याचा प्रयत्न एका टोळीने केला. मात्र, बॅंक मॅनेजरच्या सतर्कतेमुळे टोळीचा डाव फसला. पोलिसांनी ठगबाजांच्या टोळीतील तिघांना रंगेहात अटक केली. मास्टरमाइंड व त्याचा साथीदार फरार होण्यात यशस्वी झाले. पंकज नत्थूजी भोंगाडे (वय 32), निखिल दिलीपराव बनसिंगे (वय 29) व सादिक चिमथनवाला (वय 42) अशी अटकेतील ठगबाजांची नावे आहेत. सूत्रधार केशव पावनकर व सोनू सावरकर फरार आहेत. 

बॅंक अधिकाऱ्याची सजगता 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी पाच जण स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मेडिकल चौकातील शाखेत आले. त्यांनी दोन कोटी 97 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश वटविण्यासाठी बॅंकेत दिला. कोट्यवधींची रक्कम असल्याने बॅंकेच्या कर्मचाऱ्याने शाखा व्यवस्थापक सुमित इंदूशेखर झा (वय 30) यांना माहिती दिली. एवढी मोठी रक्कम असल्याने बॅंकेतील संपूर्ण यंत्रणा सजग झाली. 

पोलिसांनी घेतले तिघांना ताब्यात 

क्षणाचाही विलंब न करता सुमित यांनी झारखंडच्या उद्योजकाशी संपर्क साधला. उद्योजकांनी दिलेले उत्तर ऐकून बॅंकेतील अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपण तो धनादेश दिलाच नसल्याचे उद्योजकाने व्यवस्थापकाला सांगितले. व्यवस्थापकाला संशय आला. पाच जणांना केबिनमध्ये बसायला सांगितले. व्यवस्थापकाने इमामवाडा पोलिसांना माहिती दिली. आपला प्लॅन फसला आहे, हे तिघांनाही लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी बॅंकेतून काढला पाय घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान दोघे जण तेथून पसारही झाले. माहिती मिळताच इमामवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंदा साळुंखे, सहाय्यक निरीक्षक मुंडे यांच्यासह पोलिसांचा ताफा बॅंकेत पोहोचला. पोलिसांनी तिघांना अटक केली. या टोळीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कुख्यात भरत सहारे गवसला 


"एमपीडीए'त दोन वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात भरत कुलदीप सहारे (वय 28 रा. दत्तवाडी) याला गुन्हे शाखेच्या युनिट एकने सापळा रचून अटक केली. जुलै 2018 मध्ये सहारे याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली. दोन वर्षांपासून तो फरार होता. सहारे हा दत्तवाडी येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश पवार, संकेत चौधरी, वसंता चौरे, आशिष देवरे, रवी, मंगेश मडावी यांनी सापळा रचून अटक केली. सहारे याच्याविरुद्ध मारहाणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पीआय संतोष खांडेकर यांच्याकडे गुन्हेशाखेच्या पथकाचा पदभार येताच गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली. अनेकांनी धास्तीने परिसर सोडून पळ काढल्याची माहिती आहे.  

संपादन : अतुल मांगे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT