Gang who is spreading superstitions and misbeahved with woman caught by Nagpur police  
नागपूर

भयंकर! मुलींची निर्वस्त्र पूजा करणारी टोळी जेरबंद; भोंदूबाबाला अटक

अनिल कांबळे

नागपूर : गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढून विद्येद्वारे पैशाचा पाऊस पाडतो असे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषन करणार्‍या पाच जणांच्या एका टोळीला शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली.
विक्की गणेश खापरे (20) वृंदावननगर, दिनेश महादेव निखारे (25) कोरा, ता. समुंद्रपूर, रामकृष्ण दादाजी म्हसकर (41) दसोडा, ता. समुंद्रपूर, विनोद जयराम मसराम (42) जांभुळघाट, ता. चिमूर आणि डीआर उर्फ सोपान हरीभाऊ कुमरे (35) खापरी, ता. चिमूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी माहिती अशी, 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 च्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी शहर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांच्याकडे आली. त्या मुलीने राजमाने यांना सांगितले की, तिच्या मैत्रिणीच्या ओळखीचा विक्की नावाचा मुलगा असून तो त्याच्या ओळखीने जादूटोणा करणार्‍या डीआर उर्फ सोपान कुमरे याच्याकडे घेऊन जाणार आहे. तेथे तिला जादूटोण्याच्या तीन पातळ्या पार कराव्या लागतील. 

सर्वप्रथम तिला एका खोलीत पाठविल्या जाईल. तेथे तिच्या डोळ्यावर काळ्या रंगाची पट्टी बांधून तिला नग्न करण्यात येईल. त्यानंतर सोपान हा त्या मुलीवर कुठली शस्त्रक्रिया झाली काय, कुत्रा चावला काय, अंगावर टॅटू किंवा तिळ आहे काय याची तपासणी करणार. मुलीवर शस्त्रक्रिया झाली असल्यास किंवा कुत्रा चावल्यास तिला परत पाठविण्यात येईल. पहिल्या पातळीवर मुलगी पास झाल्यास तिला दुसर्‍या पातळीतून जावे लागेल. त्याच खोलीत पुन्हा तिला पुर्णपणे नग्न करून तिला सर्कलमध्ये उभे करणार. त्यावेळी सोपान हा मुलीला तिला तीन रंगाचे प्रकार विचारणार की, तुला कोणता रंग दिसत आहे. सोबतच आणखी काही प्रश्न विचारण्यात येतील. तिसर्‍या पातळीत मुलगी पुर्णपणे नग्नावस्थेत राहणार. 

सोपान काही प्रश्न विचारणार. त्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यास सोपान तेथून निघून जाईल. कुणीही तुझ्या अंगाला स्पर्श करणार नाही. तू घाबरू नकोस. आम्ही स्वत: विक्की, दिनेश, रामकृष्ण आणि विनोद हे देखील तेथे राहणार आहेत. तू त्याला ऐवढेच म्हण की, ‘तू आधी माझ काम कर, मग मी तुला तुझे काम करू देते’. सोपान तुला विचारेल तुला किती पैसे हवेत. त्यावर तू त्याला 50 कोटी रुपये पाहिजेत असे म्हण. सर्व झाल्यावर आपल्याला पैसे मिळणार. या आधी सुद्धा त्यांनी अनेक मुलींना पैसे मिळवून दिले असल्याचे विक्कीने मुलीला सांगितले होते.

त्यानंतर विक्कीने या कामासाठी 50 किलो वजनाच्या आणि 5 फूट उंचीच्या मुली पाहिजेत. तू तुझे 4 ते 5 छायाचित्रे, पूर्ण नाव, उंची, वजन, मासिक पाळीची तारीख व्हॉट्सअपवर पाठविण्यास सांगितले. त्यानंतर हे काम करण्यासाठी विक्की हा वारंवार मुलीला फोन करून तिच्यावर दबाव आणत होता. हे काम करण्याची तिची इच्छा नसल्याने ती पोलिसांकडे आली असेही तिेने राजमाने यांना सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राजमाने यांनी हे प्रकरण सामाजिक सुरक्षा विभागाचे सार्थक नेहते यांच्याकडे हे प्रकरण सोपवून प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश दिले.

असा रचला सापळा

पो. नि. नेहते यांनी मुलीला विश्वासात घेऊन संपूर्ण प्रकरण समजून घेतले. त्याचप्रमाणे हे काम करण्यास मी तयार आहे असे विक्कीला फोन करून सांग आणि त्याला घरी भेटण्यासाठी बोलव. त्यानुसार मुलीने विक्कीला फोन करून घरी बोलविले. इकडे पोलिस मुलीच्या घराभोवती दबा धरून बसले होते. विक्की मुलीच्या घरी येताच पोलिसांनी त्याला दबोचले. त्याने दिलेल्या माहितीवरून जाम (जि. वर्धा) येथील मध्यवर्ती बसस्थानक येथून दिनेश निखारे यास ताब्यात घेतले. त्याला डीआर उर्फ सोपान संदर्भात विचारणा केली असता त्याच्या गावातील रामकृष्ण म्हसकर हा डीआरला भेटवून देणार आहे असे सांगितले. त्यावरून रामकृष्णला देखील ताब्यात घेतले. मुलीची व्यवस्था झाल्यास विनोद मसराम हा चिमूर येेथे डीआरला भेटू अशी माहिती दिली.
लगेच पोलिसांचे एक पथक चिमूरला रवाना झाले. 

चिमूर पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी चिमूर येथील सरकारी हॉस्पिटलजवळून विनोद मसराम यास ताब्यात घेतले. विनोदने दिलेल्या माहितीवरून नदीपलीकडे असलेल्या निर्जनस्थळी एका शेतातील खोलीत डीआर उर्फ सोपान कुमरे हा पोलिसांना सापडला. त्यावेळी तो पूजा मांडत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तक्रार आल्यानंतर अवघ्या 12 तासात पोलिसांनी पाच जणांच्या मुसक्या आवळल्या.

डीआर उर्फ सोपान याने त्याच्या संपर्कातील लोकांना ‘माझ्याजवळ महाकालीची शक्ती असून अल्पवयीन मुलीची पूजा करून विद्येद्वारे पैशाचा वर्षाव करतो असे तो आमिष दाखवायचा. आरोपींच्या संपर्कात ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक लोक असून ते गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढत असत.  

याप्रकरणी पाचही आरोपींविरुद्ध लकडगंज पोलिस ठाण्यात 354(अ), 354(ड), 34 भादंवि, सहकलम 3 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियम 2013, सहकलम 12 लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 अन्वये गुन्हा नोंदवून पाचही जणांना अटक केली. पुढील तपास लकडगंजचे उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT