nagpur  sakal
नागपूर

Nagpur News : गोव्यात फक्त ४२८ रुपयांत मिळते सिलिंडर

महाराष्ट्रातही सिलिंडरवर अनुदान द्यावे ः आयटकची मागणी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वी गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपये कपात करण्यात आल्याने सर्वसामान्यांना महागाईपासून थोडा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर महाराष्ट्रशेजारील गोवा सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारने केलेल्या घोषणेनंतर अंत्योदय अन्न योजनेच्या कार्डधारकांना गॅस सिलिंडर केवळ ४२८ रुपयांना मिळणार आहे.

गोव्यामध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत एलपीजी सिलिंडरच्या रिफिलिंगसाठी मुख्यमंत्री वित्तीय सहाय्यता योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत राज्यात अंत्योदय अन्न योजना कार्डधारकांना सिलेंडरवर राज्य सरकारकडून २७५ रुपये सबसिडी देण्यात येणार आहे. केंद्र सरकारची २०० रुपयांची सबसिडी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिली जात आहे.

याशिवाय गोवा सरकारकडून एएवाय अंत्योदय रेशन कार्ड धारकांसाठी दरमहा २७५ रुपये अतिरिक्त देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे.

रक्षाबंधनानिमित्त घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये २०० रुपयांनी घट केल्याने पणजीमध्ये १४.२ किलो वजनाचा सिलिंडर ९०३ रुपयांत आहे. नागपुरात ९५२ रुपये एका सिलिंडरसाठी मोजावे लागते.

महाराष्ट्रातील सरकारने गोवा सरकारचे अनुकरण करून सिलिंडरला अनुदान द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गोवा सरकारने अंत्योदय अन्न योजनेच्या कार्डधारकांना फक्त ४२८ रुपयांत सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने अंत्योदय योजनेतील कार्डधारकांना अनुदानात सिलिंडर देण्यात यावे. वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांचे जीवन जगणेही कठीण झालेले आहे.

श्याम काळे, महासचिव आयटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

Devendra fadnavis: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला देवेंद्र फडणवीसांचे समर्थन, म्हणाले- हा तर देशाचा इतिहास

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT