The girl's marriage broke up by sending a 'message' to the boy's house, so the mother-in-law took the last step 
नागपूर

'आम्हाला कधीही सुखाने जगू दिले नाही, त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे'; वाचा छळामागच कारण

वसंत डामरे

रामटेक (जि.नागपूर) : पोटच्या मुलीचे लग्न जुळले. परंतू त्यांना पाहावले नाही. कोणीरी काड्या केल्या. मुलाच्या घरी मेसेज पाठवून ते तोडले. या कृत्याने आईचे काळीज तीळ तीळ तुटले. असेच तिने गुपचूप अनेक वार सहनही केले. शेवटी मुलीच्या बाबतीत असे झाल्याने तिला नकोसे झाले. तिने शेवटी दुःखी अंतकरणाने टोकाचे पाऊल उचलले. पण हे करण्यापूर्वी एक महत्वाची नोट लिहून ठेवली आणि त्यातून बिंग फुटले.

आम्हाला कधीही सुखाने जगू दिले नाही. सतत कुरापती काढून भांडण करून जगणे नकोसे केले. एव्हढेच नाही तर मुलीचे जुळलेले लग्नदेखील मुलाच्या घरी ‘मॅसेज’ करून तोडले. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. या सर्वांना शिक्षा व्हायला हवी, अशी ‘सुसाईड नोट’ लिहून आंबेडकर वार्डातील ५२ वर्षीय महिलेने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी त्या ५ जणांविरूद्ध गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. बुधवारी (ता.५) सकाळी ८ वाजता भगतसिंग वॉर्डातील विलास जगदीश नागपुरे याने पोलिस ठाण्यात येऊन रिपोर्ट दिली की, त्याची आई आंबेडकर वॉर्डातील सुभद्रा जगदीश नागपुरे (वय ५२) हिने घराच्या जिन्याखाली सळाखीला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

‘सुसाईड नोट’वरून फुटले बिंग
महिलेची मुलगी भावना जगदीश नागपुरे हिला आई गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच तिने वडिल व लहान भावाला सांगितले. पती व मुलाने महिलेला खाली उतरवून लगेच उपजिल्हा रूग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकाऱ्‍यांनी तपासून ती मृत झाल्याचे सांगितले. पोलिस निरिक्षक दिलीप ठाकूर, उपनिरिक्षक मिना बारंगे व परिविक्षाधिन उपनिरिक्षक सिमा बेद्रे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. इन्क्वेस्ट पंचनामा करताना महिलेच्या ब्लाऊजमध्ये ‘सुसाईड नोट’ मिळाली. त्यामध्ये अशोक नागपुरे, रजनी नागपुरे, शेवंती मोहनकर यांनी आम्हाला कधीही सुखाने जगू दिले नाही. ते नेहमी भांडण करायचे. अंगावर धावून यायचे, असे नमूद केले होते.

त्याचप्रमाणे त्यांची मुलगी भावनाचे जुळलेले लग्न पारशिवनी येथील प्रवीण केळवदे व दुधाळा येथील सागर झाडे यांनी मुलाला मॅसेज पाठवून मोडले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या ५ जणांमुळेच मी आत्महत्या करीत आहे. या सर्वांना शिक्षा व्हायला हवी, असे लिहून महिलेने आत्महत्या केली. घटनेचे गांभीर्य ओळखून या ५ जणांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास रामटेक पोलिस करीत आहेत.

संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT