कान्होलीबाराः येथील निसर्गरम्य शिवटेकडी परिसर. 
नागपूर

तुझ्या दर्शनाला देवा, झालो मी अधीर ! भाविकांची आर्त हाक

सोपान बेताल

हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर): भारत हा सणाउत्स्वाचा देश. अनेकांची उपजीविका त्यावर चालते. पण या वर्षी कोविड-१९ च्या वायरसमुळे सर्वच धार्मिक स्थळे, देवस्थाने, मठ, आजही ‘कुलूपबंद’ असल्याने मंदिरातील घंटाच मुक्या झाल्या आहेत. मंदिराच्या भिंती भक्ताची आर्त हाक ऐकण्यासाठी व्याकूळ झाल्या असल्याचे मंदिर परिसरात गेल्यावर जाणवते .तालुक्यातील  देवस्थाने बंद असल्याने अनेकांची उपजीविका चालविणे कठीण झाले आहे. व्याकूळ होऊन 'उघड दार देवा, आता उघड दार देवा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.  

उपासमारीशी दुकानदारांचा सामना सुरू
टाकळघाट येथील योगिराज विक्तुबाबा देवस्थान तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान आहे. दिवसेंदिवस भक्तांची संख्या वाढत असल्याने देवस्थान समितीने आजूबाजूच्या परिसरातील शेतजमीन विकत घेतली आहे. देवस्थानात दूरदूरहून येणाऱ्या भक्तांची राहण्यासाठी विश्रामगृह बांधले आहे. देवस्थानाच्या समोर अनेक दुकाने आहेत. आज गावातील रौनक पूर्णपणे बंद पडलेली आहे. या लहान लहान दुकानदारावंर उपासमारीची वेळ आली आहे. या देवस्थानावर अनेकांच्या संसाराचा गाडा चालतो. तो पूर्णपणे बंद पडलेला आहे. तेव्हा राज्य सरकारने तात्काळ ही बंदी उठवावी, अशी मागणी टाकळघाटचे जि.प.सदस्य आतिष उमरे करतात.
हेही वाचाःआता खुद्द जनताच विचारतेय, मौदा नगरपंचायत काम करते की राजकारण?
 

ओसाड पडली निसर्गसौंदर्याने नटलेली शिवटेकडी
कान्होलीबारा येथून जवळच  शिवटेकडी आहे. जमिनीपासून हजारो फुट उंचीवर शिवपिंडाच्या आकारात साकारलेली आहे. तिथे उंच शिवशंकर आणि पार्वतीची मूर्ती साकारली आहे . आजूबाजूला आयुर्वेदिक वनस्पती लावलेली आहे. मोठमोठ्या झाडाला झुले बाधंलेले आहेत. ऑक्सिजन शंभर टक्के उपलब्ध आहे. असा हा सुंदर परिसर आता एक्का दुक्का सोडला तर कुणी फिरुनही पाहात नाही. याची देखरेख करण्यासाठी अनेक सेवक आहेत. भक्तानी दिलेल्या दानावर बांधकाम आणि सेवकांची उपजीविका चालते. पण आता लॉकडाउनपासून कठीण झाले आहे. आता काही दानदात्यांना फोन करुन दान मागून कसे तरी सुरू असल्याची कैफियत कान्होलिबारा येथील शिवटेकडीचे विश्‍वस्त ‍सताजने  महाराज व्यक्त करतात. हनुमान मंदिर तेलगाव हे फार प्राचिन आहे. यावर्षी कोरोनमुळे सर्वच कार्यक्रम बंद आहेत. येथे सप्ताह आम्ही घेत असतो. मंगळवार, शनिवार, रविवार या दिवशी दुरून स्वयंपाक घेऊन लोक येतात. इतर दिवशी दिवसभर भक्त दर्शनासाठी येतात. आजूबाजूच्या गावातील लागणारे सामान भक्त खरेदी करतात. मंदिराच्या बाजूलाही पूजेच्या साहित्याची दुकाने लागतात. आज या सर्वांचीच फार अडचण झाली आहे. आता स्वयंपाक येत नाही. येथील देखरेख करणाऱ्यांची उपजीविका थांबली आहे. सारी दुकाने उघडण्यास सरकारने परवानगी दिली, पण मंदिरांना परवानगी का नाही, असा प्रतिप्रश्‍न हनुमान मंदिर तेलगावचे कार्यकारी अध्यक्ष सुनील निघोट करतात.

गावखेड्याच्या आर्थिक नियोजनाला ‘ब़ेक’
महाराष्ट्रात एकमेव असे ब़हस्पती देवस्थान चौकी येथे आहे. हिंगणा तालुक्यातील शेवटचे टोक आहे. या गावाची उपजीविका या देवस्थानावर चालते. गावात मोजकाच घरे आहेत. चहाटपरी, पानटपरी, हॉटेल, किराणा दुकान, पूजेच्या साहित्याचे दुकान, स्वयंपाक तयार करणारे, भांडीकुंडी साफ करणारे असा आर्थिक व्यवहार या देवस्थानाच्या भरवशावर चालतो. पण कोरोनामुळे सर्व थांबला आहे. आता एसटी बंद आहे. गावात कुणीच येत नाही, तर खरेदी कोण करणार?  
 मनोज झाडे
सामाजिक कार्यकर्ते
चौकी, हिंगणा

गाव झाला सामसुम
संताची परपंरा जपणारे किन्ही गाव. पण आता सामसूम झाले. यावर्षी भरणारी यात्रा रद्द झाली. भक्तांचे स्वयंपाक येणे बंद आहे. पाच लोकच आरती करतात. बाहेर गावचे भक्त येणे बंद असल्याने गावातील दुकानेही बंद पडल्या अवस्थेत दिसतात. त्यामुळे मंदिरे उघडलीच पाहिजे. त्याशिवाय गावखेड्यांचे आर्थिक नियोजन सुधारणार नाही .
विनोद उमरेडकर
उपसरपंच, किन्ही धानोली
ता.हिंगणा

संपादनः विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पराभवानंतर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, राजीनाम्याची केली मागणी

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT