Gold rate will cross 60 thousand inflation nagpur  Sakal
नागपूर

Gold rate : सोने ६० हजारांच्या पार जाणार

अस्थिरता, महागाईमुळे भाव वाढण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सोन्याच्या दरात सतत घसरण होत आहे. ५१ हजार २०० रुपये प्रती तोळा सोन्याचे दर आहे. मात्र आगामी चार महिन्यात सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशांतर्गत बाजारात सोने ५१ हजार रुपये प्रति १० ग्रॅमसाठी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर १ हजार ७५६ प्रती औस एवढे आहे. मात्र सोन्या-चांदीच्या तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात सोने या वर्षाच्या शेवटपर्यंत देशांतर्गत बाजारात साठ हजारांचा आकडा गाठण्याची शक्यता आहे.

देशात महागाई सतत वाढत असून त्याचे आलेख घसरण्याची शक्यता कमीच आहे. तसेच जागतिक स्तरावर वस्तूंच्या किंमती अधिक काळासाठी वाढलेल्या राहू शकतात. यामुळे सोन्याच्या दर वाढीला सपोर्ट मिळत आहे.

कारण याला महागाईपासून बचावाचे आणि चांगली गुंतवणूक म्हणूनही पाहिले जाते. महागाई वाढली की सोन्यातील गुंतवणूक वाढते. इतर अनेक परिस्थिती देखील झोपण्यासाठी अनुकूल आहेत. महागाई वाढल्यावर सोन्यातील गुंतवणूक वाढते असा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे सोन्याचे दर वाढण्याचे संकेत दिले जात आहेत.

अमेरिकेतील मंदीची भीती, व्याज दरातील वाढ, शेअर बाजारातील अवास्तव तेजी आणि भू-राजकीय तणाव अशी यामागची कारणे असू शकतात. शिवाय, ‘ब्लूमबर्ग’च्या सांगण्यानुसार वाढलेली महागाई अधिक वेळेपर्यंत राहील. यामुळे व्याजाचा दर आक्रमण पद्धतीने वाढत राहील. आर्थिक मंदीकडे वाटचाल होणार नाही. अमेरिकेतील फायनान्शिअल सर्व्हीसेस कंपनी वेल्स फार्गोच्या अहवालानुसार ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मंदीची सुरवात होईल. अशा स्थितीत डॉलरची किमत घसरेल व सोन्यात तेजी येईल असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

काही वर्षातील सोन्याचे दर असे

वर्ष दर

७ ऑगस्ट २०२० - ५६ हजार २००

१ डिसेंबर २०२० - ४८ हजार ७००

५ फेब्रुवारी २०२१ - ४७ हजार ४००

३१ मार्च २०२१ - ४४ हजार ०००

१ जून २०२१ - ४९ हजार ३१९

२८ सप्टेंबर २०२१ - ४५ हजार ९००

१८ नोव्हेंबर २०२१ - ४९ हजार २००

७ मार्च २०२२ - ५३ हजार ७००

२५ ऑगस्ट - ५२ हजार ९००

३१ ऑगस्ट २०२२ - ५१ हजार ५००

२ सप्टेंबर २०२२ - ५१ हजार १००

सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी-मंदीवर अवलंबून असतात. आता सध्या दर कमी असले तरी आगामी काळात वाढतील किंवा कमी होतील हे आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरविले जाते. मात्र, भविष्यात सोन्याला चांगला दर असेल हे निश्‍चीत. त्यामुळे गुंतवणूक म्हणून सोने खरेदी कडे कल वाढणार आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत ६० हजाराचा आकडा पार करेल असा आमचा अंदाज आहे.

-राजेश रोकडे, संचालक, रोकडे ज्वेलर्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: संजू सॅमसनची Century! ट्वेंटी-२०त विराट-रोहितच काय, तर एकाही भारतीयाला नाही जमलाय हा विक्रम

Assembly Election 2024 : पालघर जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का; कुणबी सेनेचा बहुजन विकास आघाडीला पाठिंबा

Champions Trophy 2025 : BCCI पाकिस्तानात न जाण्यावर ठाम; PCB म्हणते लेखी द्या, मग बघतोच...! IND vs PAK यांच्यात 'वॉर' जोरदार

SA vs IND T20I: अन् सूर्याच्या टीम इंडियानं राष्ट्रगीताचा अपमान होऊ दिला नाही; साऊंड बंद झाला, पण...

Trending News: अरे ये कैसा हुआ रे बाबा ! नवरा-बायकोचं भांडण अन् रेल्वेला लागला तीन कोटींचा चुना

SCROLL FOR NEXT