नागपूर

Fridge Blast: उंदीरमामामुळे झाला फ्रिजचा स्फोट! गोंदियातील घटना, जाणून घ्या सविस्तर..

गोंदियामध्ये एका उंदरामुळे फ्रिजचा स्फोट झाला आहे. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

सकाळ डिजिटल टीम

Gondia Fridge Blast: देवाजवळील दिव्यातील जळती वात उंदराने फ्रिजजवळ नेली. क्षणात फ्रिजला आग लागली. फ्रिजचा स्फोट होऊन घरातील अन्नधान्यासह साहित्य जळाले. ही घटना शुक्रवारी (ता. २९) रात्रीच्या सुमारास सूर्याटोला येथील संजय गाते यांच्या घरी घडली.
शहरातील सूर्याटोला परिसरातील शिवाजी पुतळ्याजवळ संजू गाते यांचे घर आहे.

शुक्रवारी रात्री संजू गाते हे कुटुंबासह घरातील समोरच्या खोलीमध्ये जेवण करत होते. याचवेळी फ्रीजला अचानक आग लागली व मोठा आवाज झाला. त्यामुळे गाते कुटुंब क्षणाचाही विलंब न लावता घराबाहेर पडले.

त्यानंतर आग लागलेल्या खोलीत पाणी टाकून आग विझविण्यास सुरवात केली. परिसरातील नागरिकांनीसुद्धा आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाला बोलाविण्यात आले. अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविले.

या आगीत मात्र, गाते यांचे मोठे नुकसान झाले आहे. संजय गाते यांच्या घरी देवाजवळ दिवा लावण्यात आला होता. जळत्या दिव्याची वात उंदराने फ्रीजजवळ नेल्याने फ्रीजला आग लागली आणि फ्रीजचा स्फोट झाला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: ''एक हैं तो सेफ हैं! पंतप्रधानांच्या वाक्याचा चुकीचा अर्थ घेतला'' मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला अर्थामागचा अर्थ

Prakash Ambedkar : निवडणुकीत आरक्षणाचा विषय प्रभावी ठरणार,वर्गीकरण, क्रिमिलेअर खुल्या वर्गासाठी का लागू नाही? : प्रकाश आंबेडकर

Bridal Tips: लग्नाच्या दिवशी परफेक्ट दिसण्यासाठी एक महिना आधीच करा तयारी

Latest Maharashtra News Updates : झारखंडमध्ये भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

वारकरी असणे किंवा नसणे हा निवडणुकीचा... मविआच्या उमेदवारावरून अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT