Good news price fall gold 1500 and silver 1600 Pitru Paksha 2023 nagpur Sakal
नागपूर

Gold And Silver Price : गुड न्यूज... सोने, चांदीच्या दरात घसरण; सोने १५०० तर चांदी १६०० रुपयांनी स्वस्त

ग्राहकांना दिलासा; पितृपक्ष सुरू होत असल्याने सोन्या-चांदीच्या दरात चढउतार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पितृपक्ष सुरू होत असल्याने सोन्या-चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहेत. आज सोने आणि चांदीच्याही दरात घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त दरात सोने खरेदीची सुवर्णसंधी आहे. जुलै महिन्यात सोन्याचे दर हे ६०,५५० रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​पोहोचले होते. गेल्या पाच दिवसांत सोने १,५०० रुपयांनी घसरले असून, ५८ हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

शनिवारपासून पितृपक्ष सुरू होत आहे. त्यापूर्वी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. बहुतांश ग्राहका पितृपक्षात सोने खरेदी करीत नाहीत. त्यामुळे या काळात तुलनेत मागणी थोडी कमी होते.

देशात सोन्याचा दर सहा महिन्यांतील नीचांकी पातळीवर आला आहे. डॉलरच्या निर्देशांकातील वाढ आणि रोखे उत्पन्नात वाढ हे त्याचे कारण आहे. येत्या काही दिवसांत किंवा दिवाळीपूर्वी सोने आणखी म्हणजे २ हजार ५०० रुपयांनी स्वस्त होऊ शकते.

देशात सोन्याचा भाव ५५ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतरही सोन्याचा भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १० टक्क्यांनी अधिक असेल. चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे.

चांदी प्रति किलो ७३ हजार ५०० रुपयांवरून ७१, ९०० रुपयावर आली आहे. गेल्या पाच दिवसांतच चांदी १ हजार ६०० रुपयांनी घसरली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे.

सोने अजून होऊ शकते स्वस्त

दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. याचे कारण डॉलर निर्देशांकात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या यूएस फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत व्याजदरात २५ आधार अंकांनी वाढ करू शकते. त्याचा परिणाम डॉलर निर्देशांकावरही दिसून येणार आहे.

डॉलरचा निर्देशांक ११० च्या पातळीवर पोहोचला, तर धनत्रयोदशीपर्यंत भारतातील सोन्याचा भाव सध्याच्या पातळीपेक्षा २५०० रुपयांनी कमी होऊ शकतो. याचा अर्थ सोन्याचा भाव भविष्यात ५५,५०० रुपयांपर्यंत येऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidates List: काँग्रेसकडून आणखी १४ उमेदवारांच्या नावाची घोषणा, जाणून घ्या कुणाला कुठून मिळाली उमेदवारी?

ShivSena Candidate List: दिग्गज नेत्यांची वर्णी; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, किती शिलेदार उतरले मैदानात?

MNS Candidates List: मनसेची सहावी यादी जाहीर, ३२ उमेदवारांची नावे, कुणाला मिळाली संधी?

IND vs NZ: राधा यादव लढली! बॉलिंगही केली, बॅटिंगही केली, पण टीम इंडिया हरली; न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी

Assembly Elections: उमेदवारी अर्जासाठी 2 दिवस शिल्लक, जाणून घ्या आतापर्यंत महायुती-मविआने किती उमेदवार जाहीर केलेत?

SCROLL FOR NEXT