नागपूर : महाराष्ट्रातील महाआघाडीचे सरकार फार काळ टिकेल असे दिसत नाही, आपसातील मतभेदांमुळे ते केव्हाही कोसळू शकते, असे भाकीत भाजपचे राष्ट्रीय महासचिव तसेच राज्याचे प्रभारी सी. टी. रवी यांनी यांनी केले.
महाराष्ट्र भाजपचे केंद्रीय प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते बुधवारी नागपूर दौऱ्यावर आले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यात, संघस्थळ हे प्रेरणास्थान आहे. त्यामुळे नवी जबाबदारी आल्यानंतर सर्वप्रथम प्रेरणास्थळाचे दर्शन घेण्यासाठी नागपुरात आलो असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाबाबत विचारले असता, नंबर गेमच्या आधारे सरकार किती दिवस चालणार हा प्रश्नच असल्याचे ते म्हणाले.
केवळ संख्या कारणीभूत ठरत नाही, जनतेचा विश्वास देखील आवश्यक आहे. पदवीधर आणि शिक्षक आमदाराच्या निवडणुकांचे निकाल आहेत. त्यातून सरकारला आपल्या अस्तित्वाविषयी संकेत मिळतील. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्तापक्ष आंदोलन करीत आहेत असे विचारले असता, आंदोलन आणि आरोप करण्यापेक्षा या सरकारने त्यांच्यासारखे काम राज्यात करून दाखवावे असा सल्ला त्यांनी दिला.
गोहत्या प्रतिबंधक कायदा आणि लव्ह जिहाद विरोधी कायद्यासंदर्भात विचारले असता, महाराष्ट्रात सध्या भाजपचे राज्य नाही, ते आल्यानंतर उत्तरप्रदेश पॅटर्नवर दोन्ही कायद्यांचा निपटारा करू असा विश्वास सी. टी. रवी यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी शहर भाजपाध्यक्ष आ. प्रवीण दटके, माजी खासदार अजय संचेती, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. विकास कुंभारे, डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.