मोहम्मद अब्बास या दहा महिन्याच्या बाळावर सुद्धा चार महिन्यांपूर्वी न्यू हिरो हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
नागपूर : अवघ्या १० महिन्यांची चिमुकली. दुर्मीळ अशा आजाराचे निदान झाले. या आजारात आयुष्य केवळ दोन वर्षांचे असते. वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्या बाळाला यकृत प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय होता. अशावेळी कोणताही विचार न करता आजोबांनी आपल्या यकृताचा काही भाग देण्याची तयारी दाखवली अन् डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपण (Liver Transplant) करून चिमुकलीला जीवदान दिले.
शहरातील किम्स किंग्सवे हॉस्पिटलमध्ये (Kims Kingsway Hospita) दहा महिन्याच्या बाळावर यशस्वी प्रत्यारोपण झाले. एक जीवघेणा अनुवंशिक आजार घेऊन चिमुकली जन्माला आली. ज्यामुळे तिच्या यकृताला पित्त खंडित होण्यापासून रोखले गेले. काविळमुळे त्यांचा रंग फिकट झाला होता. प्रकृती हळूहळू खालावत होती.
चिमुकलीला क्रिग्लर-नाजर सिंड्रोम (Crigler-Najjar Syndrome) हा जीवघेणा आजार होता. हा आजार अतिशय दुर्मिळ असून १ दशलक्ष मुलांपैकी एका मुलात आढळून येतो. विशेष असे की, हा आजार घेऊन जन्माला आलेल्या बाळाचे आयुष्य २ वर्ष असते असेही डॉक्टरांनी सांगितले.
होण्यापासून रोखले गेले. काविळमुळे त्यांचा रंग फिकट झाला होता. प्रकृती हळूहळू खालावत होती. चिमुकलीला क्रिग्लर-नाजर सिंड्रोम हा जीवघेणा आजार होता. हा आजार अतिशय दुर्मिळ असून १ दशलक्ष मुलांपैकी एका मुलात आढळून येतो. विशेष असे की, हा आजार घेऊन जन्माला आलेल्या बाळाचे आयुष्य २ वर्ष असते असेही डॉक्टरांनी सांगितले.
आईचा रक्तगट जुळत नव्हता. वडील प्रत्यारोपणासाठी सक्षम नव्हते. अशा परिस्थितीत नेमकं काय करावं कुणालाच कळत नव्हतं. ही बाब आजोबांना कळली. आजोबा यकृताचा काही भाग दान करण्यासाठी पुढे आले. नागपूरच्या किम्स- किंग्सवे हॉस्पिटलमध्ये जिवंत दात्याचे यकृत प्रत्यारोपण केले. अवघ्या ६. ४ किलो वजनाच्या १० महिन्यांच्या बाळावर हा प्रयोग अत्यंत आव्हानात्मक होता. यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया १० तास चालली.
शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश जैन, डॉ. दीपक गोयल यांनी कुशल वैद्यकीय पथकाच्या मदतीने हे प्रत्यारोपण केले. बालरोगतज्ञ डॉ. कुलदीप सुखदेवे, डॉ. राजकुमार किरतकर यांनी बाळाची काळजी घेतली. डॉ राजन बारोकर, डॉ वीरेंद्र बेलेकर यांच्यासह हिपॅटोलॉजीचे व्यवस्थापन डॉ. समीर पाटील आणि डॉ. अमोल समर्थ यांनी केले. बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. शीतल आव्हाड यांची मोलाची साथ या शस्त्रक्रियेला लाभली. प्रत्यारोपण समन्वयक शालिनी पाटील यांचेही महत्त्वाचे योगदान होते.
मोहम्मद अब्बास या दहा महिन्याच्या बाळावर सुद्धा चार महिन्यांपूर्वी न्यू हिरो हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अब्बासला अट्रेसिया हा आजार झाला होता. यामुळे अब्बासचे यकृत निकामी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.