नागपूर

Halba Protest:...तर उग्र आंदोलन करु! सरकारविरोधात हलबांचा संताप, जातवैधता प्रमाणपत्रासाठी पुकारले धरणे आंदोलन

हलबा, हलबी जमातीचा संविधानदत्त आरक्षणाचा अधिकार शिंदेसेना-भाजप सरकारने हिरावून घेतला असल्याचा आरोप करीत हलबा समाजाने शनिवारी संविधान चौकात धरणे आंदोलन पुकारले.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Halabi Reservation Protest: हलबा, हलबी जमातीचा संविधानदत्त आरक्षणाचा अधिकार शिंदेसेना-भाजप सरकारने हिरावून घेतला असल्याचा आरोप करीत हलबा समाजाने शनिवारी संविधान चौकात धरणे आंदोलन पुकारले.

हलबा समाजाला जातवैधता प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले. मात्र दहा वर्षे होऊनही ‘आरक्षण’ नाकारून शिंदे-फडणवीस सरकार आमच्या भावी पिढीचा बळी घेत आहे. असा विश्वासघात करणाऱ्या या सरकारचा निषेध आहे, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. हलबा समाजाची मागणी पूर्ण न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा या समाजाने दिला आहे.

मराठा समाजाने राज्यभरात आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. त्यानंतर नागपुरात गोवारी समाजाने आरक्षणासाठी संविधान चौकात चक्का जाम करीत सरकारला इशारा दिला. यानंतर आता हलबा समाजाने संविधान चौकात धरणे आंदोलनातून समाज आरक्षणाच्या मागणीवरून एकटवला असल्याचे दाखवून दिले. हलबा समाजाचे हे शक्तिप्रदर्शन होते. हलबा, हलबी जमातीचे विविध प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय आदिम कृति समितीने १८ डिसेंबरला नागपुरातील विधिमंडळावर मोर्चा काढला होता. (Latest Marathi News)

यावेळी शासनाने आदिवासी हलबा समाजाच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. परंतु पुढे काहीही होत नसल्याने हलबा समाजात प्रचंड असंतोष आहे. हा रोष सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हलबा समाजाने संविधान चौकात धरणे दिले.

आंदोलनात भाजपचे आमदार विकास कुंभारे, विश्वनाथ आसई, ॲड. नंदा पराते, दे. बा. नांदकर, धनंजय धापोडकर,प्रकाश निमजे, ओमप्रकाश पाठराबे, दीपराज पार्डीकर, राजेंद्र सोनकुसरे, प्रवीण भिसीकर, अभय धकाते, भास्कर पराते, भास्कर चिचघरे, अश्विन अंजीकर, पुरुषोत्तम सेलूकर, प्रेमलाल भांदककर, राजेश बोकडे, दीपक उमरेडकर, राजू ताबूतवाले, भास्कर पराते, कृष्णा गोटेफोडे, हेमंत बरडे यांनी आपल्या भूमिका मांडल्या.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT