हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर) : डिगडोह ग्रामपंचायत परिसरात झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या तुलनेत उपकेंद्र आहे. १५वर्षापूर्वी आमसभेत लोकमागणी झाली. ठराव मांडले. फाईल तयार झाली. आता ती लपलीय कुठे? कोण जाणे, आता नवीन सरकार आले तर महिलांचाही आवाज उठताना दिसत आहे .
डिगडोह परिसरात ५० ते६० हजाराच्या जवळपास लोकसंख्या आहे. संजयनगर, दुर्गा नगर, बालाजी नगर, साई नगर, काळमेघ नगर, वैशाली नगर, इंदिरामता नगर, पोलिस नगर, राजगृह नगर, लोकमान्य नगर जुने गाव डिगडोहचा यात समावेश आहे. ७०टक्के नागरिक हातावर आणून पानावर खाणारे श्रमिक आहेत. खासगी महागड्या दवाखान्यात उपचारासाठी ते जाऊ शकत नाही. कामगारांचे दवाखानेही ऑक्सिजनवर असल्याने त्यांचे हाल होत आहेत. ठराव झालेत पण त्याचा पाठपुरावा करण्यात शासन प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हा प्रश्न आजही फाईल मध्येच बंद पडला आहे. या परिसराच्या सरपंच महिला व जिल्हा परिषद सदस्य महिलाच असल्याने आता ही फाईल उघडेल का? याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र हवेच !
जिल्हा परिषद सभेत हा विषय आला असता मी प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी केली. मला सांगण्यात आले की डिगडोह परिसरात लता मंगेशकर हॉस्पिटल आहे . तुम्ही एक उपकेंदे घ्या. पण त्या उपकेंद्राचा फायदा होणार नाही. अनेक गरिब महिला माझ्याकडे येऊन मला सांगतात की हिंगण्यात आहे, तसे आपल्याही परिसरात आरोग्य केंद्राची गरज आहे. मी सुध्दा त्या दिशेने पाठपुरावा करून आरोग्य केंद्रासाठी तटस्थ असल्याची भूमिका डिगडोहच्या जि.प.सदस्या सुचिता विनोद ठाकरे यांनी घेतली. डिगडोह परिसर हा गरिब कामगारांचा परिसर आहे. श्रमिकांची खासगी दवाखान्यात पैसे भरण्याची कुवत नाही. मागील काही वर्षांपूर्वी जो ठराव घेतला होता , मी प्रोसिडिंग बघते आणि पुढील ग्रामपंचायत मासिक मिटींगमध्ये नव्याने ठराव घेते. आमसभेत सुध्दा या ठरावावर बहुमत घेते आणि जसे मी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देते तसेच मी प्राथमिक आरोग्य केंद्रालाही महत्व देऊन हा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न करते, असे डिगडोहच्या सरपंच सुरेश काळबांडे यांनी सांगितले.
रायपूर केंद्रावर अधिक भार होतो
डिगडोह परिसरातील रुग्णांना उपचार करण्यासाठी रायपूर येथे जावे लागते. तिथे एकच गर्दी असते. डॉक्टरवर ताण पडत असल्याने निट तपासत नाही. आमच्या ग्रामपंचायतची लोकसंख्या ५० हजारांच्या वर आहे आणि आरोग्य केंद्र नियमात बसत असताना ते आम्हाला मिळाले नाही. आम्हाला संविधानाने दिलेला आरोग्य अधिकार मिळावा हा आमचा हक्क आहे. यासाठी वंचित बहुजन आघाडी वेळ आल्यावर मोठे आंदोलन करुन तो अधिकार आम्ही शासन-प्रशासनाकडून मिळवून घेतल्याशिवाय राहणार नाही असे वंचित बहुजन महिला आघाडीच्या रेखाताई धुपे म्हटले. वातावरण बदलताच शरीरावर वातावरणाचा परिणाम होऊन वायरस, रोगाचा सामना करावा लागतो. याचाच फायदा डॉक्टर घेतात. पहिलेच घरात तंगी असते. यातच महागडे औषधी लिहून देतात. हात लावायचे २०० रुपये घेतात. यासाठी या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र उभे राहावे, या दिशेने ‘सकाळ’ ने घेतलेला विषय हा गरिबाच्या, गरजूंच्या आरोग्याची काळजी घेणारा असल्याचे गृहिणी कविता चौधरी यांनी सांगितले. या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र उघडल्यावर दाट लोकवस्तीचा फायदा घेऊन अनेक बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करतात. त्याला आळा बसेल. गोरगरीब जनता अशा डॉक्टरांना बळी पडणार नाही. कारण एमआयडीसी परिसरात श्रमिकांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे. जनतेची अनेक दिवसाची मागणी आहे . ती पूर्ण झाल्याने परिसरातील सुरक्षित आरोग्याचा प्रश्न सुटेल आणि गरिबांना आरोग्य केंद्राचा फायदा घेता येईल, असे बालाजी नगरच्या उद्योजिका सविता बबनराव पडोळे म्हणाल्या. कंपनीत काम करण्यासाठी कामगार गेल्यावर पहिल्याच महिन्यात त्याच्या पगारातून ईएसआय विमा दवाखान्याच्या नावावर पगार कपात होते. पण कामगारांना कुठलीही चांगली सेवा दिली जात नाही. त्यामुळे पगार कपात होत असतानाही त्याचा लाभ कामगार घेत नाहीत. घराजवळ असलेल्या खासगी दवाखान्यात जाऊन आपला उपचार करतात. त्यामुळे पगार कपात होवूनही सेवा मिळत नसल्याने ही पगार कपात व्यर्थ जाते. याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र झाल्यावर कामगारांना याचा लाभ मिळू शकतो, यासाठी कुणी तरी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जय दुर्गा सेक्युरिटी ॲंड लेबर कॉन्ट्रॅक्टर उषा संतोष तिवारी यांनी आवाहन केले.
जिल्हा परिषदेत प्रश्न उचलणार
मागील जिल्हा परिषदमध्ये रायपूर प्रथमिक आरोग्य केंद्रावर ताण पडत असताना मी येथील जिल्हा परिषद सदस्य असल्याने माझ्या अधिकारात हे केंद्र होते. जिल्हा परिषद स्थाई समिती आणि आरोग्य समितीकडे ठराव घेतला. जिल्हा आरोग्य अधिकिरी यांनी हा ठराव शासनाकडे पाठविला. पण तो आजही प्रलंबित आहे. परंतु मागे मी विरोधी पक्षात होते. आता मी सत्ता पक्षात असल्याने त्याचा लवकरच पाठपुरावा करुन आरोग्य केंद्र जनतेच्या सेवेसाठी बहाल करेन.
उज्वला बोढारे
महिला बाल.कल्याण सभापती
जिल्हा परिषद नागपूऱ
संपादनःविजयकुमार राऊत
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.