heavy rainfall in nagpur two lost life msrtc st bus canceled  Sakal
नागपूर

Nagpur Rain Update : अतिवृष्टीमुळे दोघांचा मृत्यू, मुलगा गेला वाहून; एसटीच्या ८९ बसफेऱ्या रद्द

Nagpur rain news | रविवारीही शहरात मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र शनिवारच्या तुलनेत पावसाचा जोर कमी होता यामुळे जनजीवन सामान्य राहिले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शनिवारी आलेल्या मुसळधार पावसाचा उपराजधानीला चांगलाच फटका बसला. विविध भागांतील नाले ओसंडून वाहत असताना यामध्ये बुडून एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. तर श्रावण विजय तुलसीकर हा १२ वर्षीय मुलगा पुरात वाहून गेला.

सुधा वेळूळकर (रा. श्रीहरी सोसायटी, नरेंद्रनगर), भोजराज बुलिचंद पटले अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे रविवारी एसटी महामंडळाच्या ८९ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. तर एका विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले.

रविवारीही शहरात मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र शनिवारच्या तुलनेत पावसाचा जोर कमी होता यामुळे जनजीवन सामान्य राहिले. शनिवारच्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले. नाल्यांनाही पूर आला. यात दोघांना जीव गमवावा लागला.

पहिली घटना बेलतरोडी भागात घडली. येथे ८५ वर्षीय महिला सुधा वेळूळकर (रा. श्रीहरी सोसायटी, नरेंद्रनगर) पूर पाहण्यासाठी बेलतरोडी-बेसा रोडवरील नाल्याजवळ गेल्या होत्या. मात्र तोल गेल्याने त्या नाल्यात वाहून गेल्या.

यानंतर नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह सेंट पॉल शाळेजवळील श्यामनगर परिसरातील नाल्यात आढळला. मनपाच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला.

दुसरी दुर्दैवी घटना श्यामनगर पुनापूर भागात घडली. येथील भोजराज बुलिचंद पटले (वय ५२) हे नाल्याजवळ उभे असताना अचानक त्यांचा पाय घसरला. पाण्यात पडल्यावर ते वाहून गेले. त्यांनतर त्यांचा मृतदेहच सापडला. पोलिसांनी मृतदेह मेयो हॉस्पिटलमध्ये पाठविला.

तर भरतवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहनबाबानगर परिसरात बारा वर्षीय मुला श्रावण विजय तुलसीकर श्रावण नाल्याच्या बाजूने खेळत असताना पाण्याच्या प्रवाहाने वाहात गेला.वृत्त लिहिपर्यंत तो सापडला नव्हता. पोलिस व अग्निशमनचे कर्मचारी त्याचा शोध घेत आहेत.

डास प्रतिबंधक फवारणी

पावसामुळे अनेक भागात पाणी जमा झाले, झाडे पडली. मनपाच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाद्वारे जलमय भागातून नागरिकांना सुखरूप बाहेर काढून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. झाडे पडलेल्या भागात झाडे, फांद्या हटविण्याचे कार्य रविवारी सुरू होते.

पाणी जमा झालेल्या भागातून पाण्याचा निचरा करण्यात आला. या भागांमधील चिखल घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे स्वच्छ करण्यात येत आहे. नाल्यांची स्वच्छता सुरू आहे. हिवताप व हत्तीरोग विभागाद्वारे डास प्रतिबंधक फवारणी केली जात आहे.

ऑरेंज अलर्ट पण अर्धा तासच बरसला

बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमीदाबाचा पट्टा मध्यभारताकडे सरकल्याने विदर्भात मॉन्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. शनिवारी मुसळधारेने परीक्षा घेतल्यानंतर आजही अपेक्षेप्रमाणे पावसाने हजेरी लावली. मात्र ऑरेंज अलर्ट असूनही केवळ अर्धा तासच बरसला.

त्यानंतर बराच वेळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. दरम्यान, २४ तासांनंतरदेखील अनेक झोपडपट्ट्या व खोलगट वस्त्यांमध्ये तुंबलेले पाणी पूर्णपणे ओसरले नव्हते. त्यामुळे नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागला. पुढील तीन-चार दिवस यलो अलर्ट असल्यामुळे नागपूर व विदर्भात पावसाळी वातावरण कायम राहणार आहे.

एक विमान रद्द, एक उशिराने

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सलग तिसऱ्या दिवशी विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले. रविवारी मुंबई येथून ७.२०वाजता नागपूरकडे जाणारे एअर इंडियाचे एक विमान रद्द करण्यात आले. इंडिगोचे मुंबई येथून नागपूरकडे येणारे सांयकाळी ७.४५ चे विमान तब्बल दोन तास विलंबाने आले. शनिवारी विमान रद्द झाले होते. तर दोन विमाने भोपाळकडे वळविली होती.

शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

सोमवारी, २२ जुलै रोजीही पावसाचा धोका वर्तविण्यात आला आहे. पुन्हा विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

याबाबतचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला असून शाळांनाही तसे कळविण्यात आले आहे. शनिवारी आलेल्या मुसळधार पावसाच्या वेळी उशिरा सुट्टी जाहीर केल्याने विद्यार्थ्यांची आणि शाळांची मोठी गैरसोय झाली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात ७२ घरांचे नुकसान

शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने साहित्यासोबत घराचेही नुकसान झाले. शनिवारी पहाटेपासून पावसाने हजेरी लावली. सकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातील ३० महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले. घरांचे नुकसान झाले.

जिल्‍ह्यात ७२ घरांचे अंशतः नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. सर्वाधिक २९ घरांचे नुकसान कुही तालुक्यात झाले. त्या पोठापाठ भिवापूर तालुक्यात १६, उमरेड तालुक्यात १५ घरांचे नुकसान झाले. मौद्यात ९, कळमेश्वरमध्ये २ तर हिंगणा तालुक्यात एका घराचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनकडून देण्यात आली.

नुकसानग्रस्त भागात मनपाचे मदतकार्य

मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचून नुकसान झाले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल आणि अजय चारठणकर यांनी अशा भागांना भेटी देऊन पाहणी केली.

मदतकार्य करण्याचे निर्देश आयुक्तांनी प्रशासनाला दिले. मनपाचे अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग, उद्यान विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग, आरोग्य विभाग, हिवताप व हत्तीरोग विभाग या सर्व विभागांद्वारे समन्वयाने मदत आणि सेवाकार्य करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT