helpless mother 
नागपूर

मुलाच्या भेटीसाठी व्याकूळ झाली ही माऊली, म्हणते मरायच्या आधी त्याला भेटायचं आहे (व्हिडिओ)

प्रमोद काळबांडे

नागपूर : गडाचा दरवाजा बंद झाल्यावर तान्ह्या बाळाला दूध पाजण्यासाठी उंचच उंच गड चढून जाणारी शिवकालीन साहसी माय- हिरकणीची नोंद छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली होती. ही माय इतिहासाच्या पानांवर अजरामर झाली. परंतु, लॉकडाउनमध्ये अखेरच्या पुत्रभेटीसाठी तडफडत मैलोगंती घुसत घुसत निघालेली एक माय मात्र कुणाच्याही नजरेत आली नाही. 

वर्धा मार्गावरील जामजवळ असलेल्या गणेशपूर या पारधी बेड्यावरील संधुनाथ भोसले आणि त्यांचा मुलगा सनम हे शिवारातील जंगलात शिकारीच्या शोधात फिरत होते. लाव्हे-तितर मिळतील, अशी अपेक्षा त्यांना होती. त्यांच्या पारधी बेड्यावर लॉकडाउनमुळे हाल सुरू झाले आहेत. हातमजुरी करणारे लोक, बाहेर जाऊन भीक मागणारे लोक बेड्यावर राहतात. बाहेरचे सर्व कामच थांबले. झोपडीत होते नव्हते ते सरत आले. त्यामुळे दोन वेळेच्या जेवणाचाही प्रश्न बेड्यापुढे निर्माण झाला. संधुनाथ हे सामाजिक कार्यकर्ते. त्यांच्या समाजाची त्यांना तळमळ. परंतु, भूक त्यांच्याही कुटुंबाच्या वाट्याला आली. त्यामुळे सांज भागविण्यासाठी शिकारीच्या शोधात ते निघाले. दुपार झाली तरी शिकार गावली नाही. आता रणरणत्या उन्हात पक्षी बाहेर पडणार नाहीत. त्यामुळे निराश होऊन आल्यापावली ते परतायला लागले. 

एप्रिलचे ऊन "मी' म्हणत होते. बाटलीतील पाणी संपले होते. घशाला कोरड पडली होती. अचानक समोर नजर गेली. समोरचे दृश्‍य बघून ते अवाक झाले. एक वृद्ध महिला रस्त्यावरील तप्त दगडी गिट्टीवरून घुसत घुसत येत होती. संधुनाथने रस्त्याच्या दोही टोकांकडे नजर टाकली. जामजवळच्या नंदुरी गावाजवळून आतमध्ये असलेल्या या निंभा-अरंभा रस्त्यावर दूरदूरपर्यंत चिटपाखरूही दिसले नाही. उन्हाच्या तप्त ज्वाळा झळाळताना तेवढ्या दिसल्या. वृद्धेच्या घुसत घुसत जाण्याचा सर्र-सर्र आवाज आणि तिच्या ओठांतून हं हं अशी काहिली बाहेर पडत होती, अतीव दुःख आणि कमालीचे दारिद्य्र वाट्याला आलेले संवेदनशील संधुनाथ भोसले यांचे मन द्रवले. ते त्या वृद्धेसोबत त्यांच्या वाघरी भाषेत बोलू लागले. "मा... मा...व मा... क्‍या नी ज?' अर्थात, कुठे निघाली? असे तीन-चारदा विचारल्यावर ती पुटपुटू लागली. परंतु, घुसणे मात्र थांबवले नाही. रस्ता तुडवून गाव जवळ करण्याचा एकच ध्यास तिने घेतला होता. माथ्यावरील सूर्याची आग सुसह्य व्हावी, यासाठी डोक्‍यावर पोटली ठेवली होती. तिची काही मदत करावी, तर संधुनाथकडे बाटलीत टिपूसभर पाणीही नव्हते. संधुनाथ दैनिक "सकाळ'शी जुळलेले. त्यामुळे त्यांच्यातील कम्युनिटी रिपोर्टर जागा झाला. त्यांनी व्हिडिओ केला. "सकाळ'कडे पाठविला. संधुनाथने सांगितलेली तिची कथा हादरवणारीच होती. तिचा मुलगा सीमेजवळच्या कुण्यातरी गावात राहतो. ही कुठल्या तरी शहरातून होती. 

लॉकडाउमध्ये दोघेही आपापल्या ठिकाणीच अडकले. यात महिना निघून गेला. एवढे दिवस मुलाची भेट नाही. त्यामुळे ती व्याकूळ झाली. रस्त्यावर आली तर गाड्या बंद. ऑटो किंवा कोणतेही वाहन दिसले नाही. मग तिने निर्धार केला आणि ती निघाली. "एक माय काय धाडस करू शकते, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले सायेब', असे संधुनाथ सांगत होते. पाच किलोमीटरच्या अंतरावर कोणतेही गाव नव्हते; परंतु ही कुठून चालत आली, याविषयी ती काहीही बोलली नाही. पण, "मराच्या पह्यले पोराले भटाचं हाये' अशी बडबडत होती. "जर समुद्रपूर येथून आली असेल, तर तिला खरंच मानावं लागेल सायेब. लय अंतर हाये थे. लॉकडाउमुळे आपुन सारे जाग्यावर बसलो. आईच्या अंत्यसंस्काराला पोरगा येऊ नायी शकला. त्याले व्हिडिओवरूनच दर्शन घ्यावं लागलं. परंतु हे त माय होये. पोराच्या भेटीसाठी कितीबी कष्ट भोगावे लागले तरी ती जाईनच. मायची बराबरी या जगात कोनीबी नायी करू शकत सायेब. लोकायले सांगा हीची माहिती. मायचं मोठेपण समजू द्या साऱ्या लोकायले. मराच्या आंधी भेट झाली पाह्यजे तिच्या पोराची', हे बोलत असताना संधुनाथचा स्वर भरून आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : सातारा महामार्गावरील खांबटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT