harbal chocolate 
नागपूर

घ्या आता म्हणे चॉकलेटही हर्बल

मनीषा मोहोड

नागपूर : मुलांच्या संगोपनात वेळ घालविणाऱ्या गृहिणींनी जर मनात आणले तर, त्या लाखोंची उलाढाल सहज करू शकतात याची प्रचीती अनेक महिलांनी आपल्या कामातून दिली आहे. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे हिंगणा टी पॉईंट परिसरातील माधुरी पाटील या आहेत. त्यांनी हर्बल चॉकलेटची निर्मिती केली असून त्या व्यवसायात चांगलाच जम बसविला आहे.

माधुरी यांनी घरकामातून वेळ काढून छंद म्हणून चॉकलेट बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. व्यावसायिक प्रशिक्षणादरम्यान, त्यांच्या कल्पकतेतून हर्बल चॉकलेट ही संकल्पना उदयास आली. लहान मुलांच्या आरोग्यासाठी आवश्‍यक असलेली बुद्धीवर्धक आणि पौष्टिक पदार्थांच्या वापरातून, घरीच हर्बल चॉकलेटची निर्मिती करण्यास त्यांनी सुरूवात केली. सुरूवातीला कुटुंबातील, नातेसंबधातील, शेजारीपाजारी या चॉकलेटची चव चाखण्यास दिल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळाला. मग, त्यांनी या उत्पादनाला व्यवसायाची जोड देण्यासाठी परिसरातील दहा महिलांना सोबत घेऊन, "स्वामिनी महिला बचत गटा'ची स्थापना केली. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी आता मोठ्या प्रमाणात हर्बल चॉकलेटची निर्मीती करण्यास सुरूवात केली आहे. चार वर्षापूर्वी घरात छंद म्हणून, सुरू केलेल्या कामाला आज व्यापक रूप मिळाले असून त्यापासून परिसरातील 20 ते 25 महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. बचत गटाने तयार केलेले हर्बल चॉकलेट बाजारपेठेतील इतर चॉकलेटपेक्षा वेगळे असून, यात रासायनिक पदार्थांचा वापर बिलकूल करण्यात आलेला नाही. घरगुती, ड्रायफ्रुट, खारीक, मनुका, ब्लॅक, व्हाईट चॉकलेट शेक इत्यादीच्या वापरातून, तब्बल 36 फ्लेवर्स च्या "हर्बल चॉकलेट' ची निर्मीती झाली आहे. विदेशी चॉकलेट प्रमाणे आकर्षक पॅकेजींग केल्याने, हर्बल चॉकलेट मुलांच्या पसंतीस उतरली आहे. स्वामिनी बचत गटातील महिला या चॉकलेटची विक्री, परिसरातील मॉल, किराणा दुकाने, दुध डेअरी, पान शॉप यासह विविध प्रदर्शनामध्ये करतात. बचत गटात नीता शिरसागर, कुंदा नागपूरे, प्रिया सिंग, पूनम पाटील, करिश्‍मा कुंभारे, करिश्‍मा पवार, प्रिया मुर्तीराज, अश्‍विनी पवार, पूजा पाटील, शितल देवरे, लता पाटील यांचा समावेश आहे.

चॉकलेटसह अनेक पदार्थ
बचतगटाच्या माध्यमातून हर्बल चॉकलेटची निर्मिती केल्याने, आम्हाला चांगले उत्पन्न प्राप्त होते आहे. चॉकलेटची चवही सर्वांना आवडल्याने, बाजारपेठेत चांगली मागणी आहे. चॉकलेटसह मेवा करंजी, विविध प्रकारचे लाडु, मठरी, चिवडा, डिस्को समोसा इत्यादी अनेक उत्पादनांची निर्मिती आम्ही बचतगटाच्या माध्यमातून करतो.
ृ-माधुरी पाटील, स्वामिनी महिला बचत गट.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT