How many hours do we wait? 
नागपूर

आम्ही किती तास करायची प्रतीक्षा?

केवल जीवनतारे

मेयो, मेडिकलमधील कोरोनाबाधितांची व्यथा 

-रक्ताच्या तपासण्यांसाठी तासभर लागतो 
-एक्स-रे काढण्यासाठी दोन तास लागतात 
-ईसीजी तपासण्यासाठी तासभर लागतो 

नागपूर  : दर दिवसाला कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड फुगत असताना मेडिकल आणि मेयो रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांनी आपली व्यथा मांडली आहे. तास दोन तास मेयो मेडिकलच्या परिसरात एक्स-रे, रक्ताच्या तपासण्या आणि ईसीजी तपासणीसाठी घालवतात. येथे आम्हाला ताटकळत राहावे लागते. आमच्यामुळे इतरांना कोरोना होण्याचा धोका आहे. आमची तपासणी लवकर केल्यास आम्ही घरी जाऊ शकतो किंवा गरज पडल्यास उपचारासाठी रुग्णालयातही जाता येईल. मेडिकलमध्ये गर्दीमुळे आमचाही जीव धोक्यात येतो, ही व्यथा आहे सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांची. 

मेयो आणि मेडिकल परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित गर्दी करीत असल्याचे चित्र येथे दिसून येते. यामुळे इतरांना संक्रमणाचा धोका दुपटीने वाढला आहे. नागपूरसह गावखेड्यातील रुग्ण येथे येत असून विषाणूचे सामूहिक संक्रमण झाल्याचे खुद्द पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काही दिवसांपूर्वी मान्य केले होते. मात्र, मेयो आणि मेडिकलचे प्रशासन यावर उपाययोजना करीत नाही.

नागपुरात कोरोनाची स्थिती गंभीर वळण घेत आहे. दररोज हजार नवीन कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. यातील शेकडो रुग्ण मेडिकल, मेयोत एक्स-रे, रक्ताच्या तपासण्या आणि ईसीजी करण्यासाठी येतात. या तपासण्यास गृह विलगीकरणाची गरज असलेल्यांना डॉक्टर औषधांच्या चिठ्ठ्या लिहून देतात. या तिन्ही रुग्णालयांत सध्या रुग्णांचा भार खूप वाढला आहे. एकेका तपासणीसाठी रुग्णांना दीड ते दोन तास प्रतीक्षा करावी लागते. तिन्ही तपासण्यांसाठी तब्बल पाच ते सहा तास लागतात. 

लहान मुलांचे रडण्याचे आवाज 

संशयित आणि कोरोनाबाधितांसाठी स्वतंत्र मोठे दालन हवे आहे. बसण्याची पुरेशी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, जागा तर सोडा, बाधितांसाठी तसेच संशयितांसाठी स्वतंत्र स्वछता गृहदेखील नाही. यामुळे संक्रमण वाढत असल्याची चर्चा येथे आहे. पिण्याच्या स्वच्छ आणि शुद्ध पाण्याची सोय येथे दिसत नाही. यामुळे संशयित आणि बाधितांनामध्ये प्रचंड असंतोष भडकला आहे. तपासणीसाठी पाच तास उलटल्यानंतर पाणी मिळत नसल्याची व्यथाही रुग्णांनी बोलून दाखवली. लहान मुलांनाही येथे उपचारासाठी आणले जाते. त्यांचीही किव येथील व्यवस्थापनाला येत नाही. चिमुकली मुले रडतात, किंचाळतात. हा आवाज मेडिकलच्या भिंतींना छेदून जातो; मात्र व्यवस्थापनाला पाझर फुटत नाही. मेयो, मेडिकलच्या प्रशासनाशी संपर्क साधला असता, सर्व सोयी केल्याचा दावा करण्यात आला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

Bramhapuri Assembly Election Results 2024 : ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांनी घातला विजय मुकुट! तब्बल 'इतक्या' मतांनी विजयी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Guhagar Assembly Election 2024 Results : गुहागरचा गड शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी राखला; महायुतीच्या राजेश बेंडलांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT