नागपूर

नागपूरकर बेलगाम! कोरोनाची दहशत असूनही बाजारपेठांमध्ये गर्दीच गर्दी

अथर्व महांकाळ

नागपूर : 'ब्रेक द चेन' (Break the chain) अंतर्गत कोरोनाची (Maharashtra corona Update) चेन रोखण्यासाठी राज्य सरकार (Government of Maharashtra) आणि स्थानिक प्रशासनाकडून गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रासह नागपुरातही (Nagpur Lockdown) कडक निबंध लावण्यात आले होते. यात अत्यावश्यक सेवा वगळता कुठलीच दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. या कालावधीत कोरोनाग्रस्तांचे आकडे हळूहळू कमी होऊ लागले. त्यामुळे १ जूनपासून निर्बंध शिथिल (Nagpur Unlock) करण्यात आले. मात्र आता नागपूरकरांनी बाजारपेठांमध्ये एकच गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. (Huge crowd in Nagpur Markets after unlock)

गेल्या काही महिन्यांपासून एका दिवसातील कोरोना पॉझिटिव्ह नागरिकांचा आकडा हजारोंच्या घरात होता. मात्र लॉकडाउनमुळे हे आकडे कमी होण्यास सुरुवात झाली. हळूहळू आकडा ५०० च्या पोहोचला. बाधितांची मृत्युसंख्याही कमी झाली. त्यामुळे आता निर्बंध शिथिल करून सर्व प्रकारची दुकानं सकाळी ७ ते दुपारी २ खुली करण्यात आलीत. मात्र आता नागपूरकांचा संयम संपला की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

महाल, सीताबर्डी, इतवारी अशा काही मुख्य बाजारपेठांमध्ये नागरिकांची अक्षरशः झुंबड आहे. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती यांसह संपूर्ण कुटुंब खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. इतकंच नाही तर काही लोकं नियमांचं पालन न करता रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. कोरोना गेला की काय? असं चित्र सध्या बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे.

ना मास्क, ना सोशल डिस्टंसिंग

बाजारपेठांमधील गर्दीमध्ये अनेकजण मास्क न लावता फिरत आहेत तसंच सोशल डिस्टंसिंगही पाळल्या जात नसल्याचं चित्र आहे. काही ग्राहक मास्क न लावता दुकानांच्या आत प्रवेश करत आहेत. ज्या काळात डबल मास्किंग आवश्यक आहे त्या काळात एकही मास्क न लावता नागरिक फिरताहेत.

कोरोना आकडेवारीत आता जरी घट बघायला मिळाली तरी ही वादळापूर्वीची शांतता असू शकते. आकडा कमी झालेला बघून नागरिकांनी गाफीलपणा दाखवला तर पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास वेळ लागणार नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असताना हा गाफीलपणा अत्यंत महागात पडू शकतो. त्यात अपुऱ्या सुविधांमुळे अनेकांना पुन्हा जीव गमवावा लागू शकतो. कोरोनाची ही घटती आकडेवारी नक्कीच दिलासादायक आहे. मात्र कोरोनमुक्त होण्यासाठी आपल्या सर्वांना कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळणं आवश्यक आहे.

(Huge crowd in Nagpur Markets after unlock)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamala Harris vs Donald Trump election : डोनाल्ड ट्र्म्प आघाडीवर... पण कमला हरिस यांचा कमबॅक शक्य; अंतिम निकाल कधी लागणार?

Andhari Vidhansabha: ऋतुजा लटके पुन्हा मारणार बाजी की मुरजी पटेल देणार धोबीपछाड? अंधेरी पूर्वेत दोन्ही शिवसेनांमध्ये चुरशीची लढत

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

भाजपची 'ती' ऑफर स्वीकारली असती, तर जयंतराव आणि मी लालदिव्यातून फिरलो असतो; सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट

हे काय वागणं आहे... Bigg Boss 18 मधील 'या' स्पर्धकावर भडकली रुपाली भोसले; सिद्धार्थ शुक्लासोबत तुलना करत म्हणाली-

SCROLL FOR NEXT