file photo 
नागपूर

पोटात भूक घेऊन त्यांचा 800 कि.मी.चा पायी प्रवास 

केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनामुळे देश लॉकडाउन झाला. रस्त्यावरचे आयुष्य जगणाऱ्यांचे हातचे काम गेले. कामगार, मजूर भुकेमुळे सैरभर झाले. पोटाची भूक भागत नसल्याने स्थलांतरित मजुरांनी घरचा रस्ता धरला. पुण्यात एका कंपनीत कामाला असलेल्या मजुरांना मालकाने घरी जाण्याच्या सूचना दिल्या. बिचारे कामगार डोक्‍यावर भारा अन्‌ पोटात भूक घेऊन लॉकडाउनच्या काळात पायी निघाले. रस्त्यावर ठेचा लागल्या. पाय रक्तबंबाळ झाले. आम्ही उपाशीपोटी चालू, पण आम्हाला गावी जाऊ द्या, अशी विनवणी अडवणाऱ्या पोलिसांना करीत नजर चुकवत हे मजूर पुण्याहून मजल दरमजल करीत रात्री नागपुरात दाखल झाले. 
कामगारांच्या संघर्षाचे आणि एकतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या पर्वावर कामगारांच्या नशिबी कोरोनामुळे भूकबळी जाण्याची वेळ आली आहे. या मजुरांना कामगारदिन म्हणजे काय हेदेखील ठाऊक नाही. अशातच हातचे काम गेल्याने घराकडे निघालेल्या या मजुरांनी 800 किलोमीटरचा प्रवास पायी केला. हे सारे मजूर मध्य प्रदेशातील. चार वर्षांपासून पुण्यात कामाला गेले होते. मात्र कोरोनामुळे त्यांचा रोजगार बुडाला. आता पुण्यात राहणे अवघड झाले. यामुळे दहा दिवसांपूर्वी पुणे महामार्गाने पायी निघाले होते. चार वर्षांपूर्वी कंपनीत नोकरी मिळाल्याचा आनंद झाला खरा, परंतु हा आनंद कोरोनाने फार जास्त काळ टिकू दिला नाही.

लॉकडाउन झाल्याने कंपनीनेदेखील या कामगारांसाटी दारे बंद केली. त्यांना वाऱ्यावर सोडून दिले. शेवटच्या महिन्याचा पगारही हाती न मिळाल्याने त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली. हाताला काम नाही आणि खिशातील पैसेही संपल्याने शेवटी उपाशी राहण्यापेक्षा गावी गेलेले बरे, असा निर्धार करीत वाहनाची सोय करण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाहन उपलब्ध न झाल्याने पायी जाण्याचा निर्णय घेतला. अखेर दहा दिवसांपासून पहाटेपासून त्यांचा प्रवास सुरू होत असे. 
पुणे ते नागपूर महामार्गावर मध्ये-मध्ये अनेक ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी जेवण दिले. काहींनी आर्थिक मदतही केली. त्यांचे आभार मानत हे मजूर नागपूरला पोहोचले. नागपुरातून ते पुढच्या प्रवासासाठी निघाले. पांढुर्णाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. 

कडेवर चिमुकले 
यातील दोन-तीन महिलांच्या कडेवर चिमुकले बाळ होते. अंगावर पिणाऱ्या या लेकराची भूक भागवणे कठीण होत होते. परंतु, गावखेड्यात, महामार्गावर मदत मिळत गेल्यामुळेच आम्ही येथपर्यंत पोहोचलो, असे या मजुरांचा म्होरक्‍या संदीप सूरजा यांनी सांगितले. 

इतिहासात प्रथमच असाही कामगारदिन 
4 मे 1886 मध्ये अमेरिकेतील कामगारांनी आठ तास काम करण्यास नकार दिला होता. त्यासाठी त्यांनी संपही पुकारला होता. आपल्या न्याय्य हक्कासाठी कामगारांनी शिकागोच्या हेमार्केटमध्ये शांतता रॅलीचे आयोजन केले होते. त्या वेळी हेमार्केटमध्ये बॉम्बस्फोट झाल्याने कामगारांमध्ये धावपळ उडाली. चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलक कामगारांवर गोळ्या झाडल्या. अनेक कामगार ठार झाले. त्यानंतर 1889 मध्ये या कामगारांच्या स्मरणार्थ 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा करण्याची घोषणा समाजवादी संमेलनात करण्यात आली होती. त्यानंतर दरवर्षी जगभरात 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगारदिन म्हणून साजरा केला जातो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींनी केला फोन, काय आहे कारण?

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT