नागपूर ः पतीच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे कंटाळलेल्या पत्नीने त्याला उपदेशाचे डोज दिले. शब्द वाढत गेल्याने दोघांत वाद झाला. पत्नीला घाबरविण्यासाठी पतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. दारू सोडण्यास मनाई करीत तो वस्तीतील सार्वजनिक विहिरीजवळ पोहचला.
तेथे पत्नीने त्याची समजूत घातली. दारूच्या नशेत असलेला पती नाटक करीत ‘टाकू का विहिरीत उडी...’ अशी पत्नीला धमकी देत होता. दरम्यान त्याचा काठावरून तोल गेल्याने तो विहिरीत पडला. त्याला पोहणे येत नसल्यामुळे बुडून दुर्दैवी अंत झाला. राजेश कांबळे (४७, शंकरपूर) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश हा खासगी काम करतो तर पत्नी मेट्रोमध्ये नोकरीला आहे. त्यांना दोन मुली एक मुलगा आहे. राजेश यांना दारूचे व्यसन होते. त्याला दारू सोडण्यासाठी पत्नी वारंवार समजूत घालत होती. मात्र राजेश सुधरायचे नाव घेत नव्हता.
मंगळवारी दुपारच्या सुमारास पत्नी घरी आली असता राजेश दारुच्या नशेत आढळून आले. यावेळी पत्नीने त्यास समुपदेशनाचे डोज दिले. मात्र राजूचा गैरसमज झाला आणि तो रागाच्या भरात घराबाहेर पडला. वडीलांच्या मागेच त्यांची मुलगी धावत निघाली. त्याच्या पाठोपाठ पत्नीसुद्धा आली. दरम्यान राजूने वस्तीतीलच सार्वजनिक विहिर गाठली. तेथे पत्नीला घाबरविण्यासाठी आत्महत्येचे नाटक करीत असतानाच विहिरीत तोल जाऊन पडला, अशी माहिती बेलतरोडी पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
संपादन : अतुल मांगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.