If anyone Suicide for electricity bill, BJP struggle with government : Chandrasekhar Bavankule 
नागपूर

‘यापुढे वीज बिलासाठी आत्महत्या झाल्यास सरकारसोबत संघर्ष’; कोणत्या मोठ्या नेत्याने केले हे वक्तव्य, वाचा सविस्तर 

अतुल मेहेरे

नागपूर : वीज बिलासाठी आत्महत्या करणे, ही शरमेची गोष्ट आहे. आत्तापर्यंत तेराशेहुन अधिक आत्महत्या झाल्या आहेत. गेल्या चार महिन्यांपासून आम्ही सरकारकडे वीज बिल माफ करण्याची मागणी करतो आहे. पण, सरकारचे त्याकडे लक्ष नाही. आता यापुढे वीज बिलासाठी एकही आत्महत्या झाली, तर भारतीय जनता पक्ष सरकारसोबत संघर्ष उभा करेल, असा इशारा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिला.

शनिवारी यशोधरानगमध्ये राहणारे लीलाधर गायधने यांनी अवाढव्य वीज बिल आल्यामुळे आत्महत्या केली. त्यांना त्यांच्या दोन मजली घराचे वीज बिल तब्बल ४० हजार रुपये पाठवण्यात आले होते.  बिलाची रक्कम बघून त्यांना धक्कच बसला. चुकीने अवाजवी बिल पाठविण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे होते. यामुळे महावितरण कार्यालयाकडे तक्रार केल्यात. वारंवार चकरा मारल्या, अधिकाऱ्यांच्या भेटी घेत विनवण्याही केल्या. पण काडीचाही उपयोग झाला नाही. उलट बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडीत करण्याचा इशारा दिला. या प्रकाराने ते कमालीचे व्यथित झाले. यातूनच त्यांनी जास्त दारू पिण्यास सुरुवात केली होती. शनिवारी दुपारी घरासमोरच अंगावर रॉकेल टाकून त्यांनी स्वत:ला पेटवून घेतले. कुटुंबीयांनी धावपळ त्वरित आग विझवून तत्काळ त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.

तब्बल ४० हजार रुपये बिल आल्याने गेल्या काही दिवसांपासून गायधने त्रस्त होते. भरमसाठ बिलाचा धसका आणि अधिकाऱ्यांकडून मिळणारी तुसडेपणाची वागणूक यामुळे व्यथीत होऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे आप्तेष्टांचे म्हणणे आहे. तूर्तास यशोधरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने जनतेमध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनेबाबत चीड व्यक्त केली आहे. यापुढे वीज बिलासाठी आत्महत्या तर खपवून घेणार नाहीच, पण एखादा लाइनमन जरी कुणाच्या घरी वीज खंडीत करायला गेला, तर सरकारसोबत संघर्ष करू, असा इशारा त्यांनी दिला.

२८ हजार कोटी थकित, पण, एकही कनेक्शन कापले नाही 

बावनकुळे पुढे म्हणाले, आमच्या सरकारमध्ये ४५ लाख शेतकऱ्यांना पाच वर्ष २८ हजार कोटी थकित झाले होते. पण, आम्ही एकही कनेक्शन कापले नाही. या सरकारने चार महिन्यांचे प्रतिमहिना ३०० युनिट याप्रमाणे १२०० युनिट वीज बिल माफ करावे, अशी मागणी आम्ही गेल्या चार महिन्यांपासून करतो आहे. पण त्यांनी अद्याप ते केले नाही. त्यामुळेच अशा आत्महत्यांच्या घटना घडत आहेत. वीज बिलामुळे आत्महत्या करण्याची वेळ सरकारने जनतेवर आणली आहे. कारण कुठलाही सर्वसामान्य माणूस एवढे बिल भरूच शकत नाही. आजही वेळ गेलेली नाही. सरकारने चार महिन्यांचे प्रतिमहिना ३०० युनिटप्रमाणे १२०० युनिटचे वीज बिल माफ करावे आणि होणाऱ्या आत्महत्या थांबवाव्या. 

संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT