file 
नागपूर

सहारा देता येत नसेल तर देऊ नका, पण तिरस्कार तरी करु नका हो...

रूपेश खंडारे

पारशिवनी (जि.नागपूर) : कोरोना व्हायरस सगळीकडे पसरू नये म्हणून त्या सामाजिक कार्यकत्याने जिवाचे रान केले. गरजू, कामगार, पादचारी, गोरगरिबांना रात्री बेरात्री मदत करुन शहर कोरोनापासून अलिप्त ठेवले.  नगरवासी शांत झोपेत असताना तो मात्र रात्रंदिवस त्यांच्यासाठी जागून काढत होता. त्याने सजग प्रहरी होऊन गावावर येणारे संकट परतवून लावले. मुलाबाळ, आईवडिलांपासून दूर राहिला. त्याची अर्धांगिणी दारात वाट पाहत उभी असायची, तरीही तो दुसऱ्यांकरीता धावपळ करत असल्याचा तिलाही अभिमान होता. त्याच्यात धुंद होती समाजसेवा करण्याची. परप्रांतीय नागरिकांना जेवण देऊन त्यांना वाहनाने त्यांच्या दारापर्रयंत पोचविण्यासाठी तो सतत धडपडत करीत होता. त्यांचा प्रवास सुखदायक करुन देण्यासाठी तो स्वतःला वाहून घेत होता. त्यासाठी इतरांसमोर हातसुद्धा पसरण्याची वेळ आली, आणि प्रसंगी त्याने तेही केले. कोरोना व्हायरसचा प्रकोप असताना, जे होईल ते करण्याचा पूरेपूर प्रयत्न करीत गेला. शेवटी त्याच्यावरच असहाय होण्याची आली, आणि घडले असे... 
 
अधिक वाचा :कृषी विभाग म्हणतो, रानभाज्या खा आणि तंदुरूस्त राहा !

कार्यकर्त्याने पत्रातून मांडली मांडली व्यथा
तो पारशिवनी या शहरातील एक सामाजिक कार्यकर्ता. समाजसेवा करण्याची त्याला अगोदरपासूनच आवड. परंतू हे करीत असताना त्याच्यावरही आजारी होण्याची वेळ आली. सगळ्यांच्या टिकेचे तो लक्ष झाला. त्याने एका पत्रातून त्याच्या मनातील वेदनांना वाट करून दिली. तो म्हणतो, संसर्ग होईल, मीही आजारी पडेल, मला मृत्यू येईल, माझ्या मुलांचे, पत्नीचे, आई वडिलांचे काय होईल, याचा जराही मी विचार केला नाही. कारण माझं गाव, शहर, माझे शहरवासी, मित्रमंडळी   सुखरुप राहावे, आनंदीत जगावेत, आजारमुक्त राहावेत, त्यासाठी  शासकीय मदतीशिवाय हजारो लोकांना त्यांच्या घरी विपरीत परिस्थितीत पोहचविले. त्यात त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता मला नवचैतन्य मिळत असल्याने जोमाने या कार्यात स्वतःला झोकून दिले.आता ते दिवस निघून गेले खरे!  जेव्हा खरी त्या कोरोनापासून भीती होती, तेव्हा मात्र माझ्याजवळ तो आजार येऊ शकला नाही आणि मला हरवून शकला नाही .पण कोरोना व्हायरसने पाठलाग सोडला नाही. पसरत पसरत तो शेवटी इतरांच्या अनिर्बंध वागणुकीमुळे शहरात शिरला. इतरांना लागण झाली.  हळूहळू जोतो या आजाराच्या विळख्यात सापडला. ज्याच्यासाठी मी प्राणाची आहुती देण्यासाठी मागे पुढे पाहिले नाही, तेच आज इतरांना हा आजार होत असल्याने ‘आपण त्यातले नाही रे बाप्पा’  म्हणत इतरांबद्दल तिरस्काराच्या भावनेतून हिणवत आहेत. जेव्हा आपुलकीची, मानवतेची, मदतीची, आस्थेची, प्रेमाची नी सहकार्याची  गरज आहे, तेव्हा मात्र माझे कुणीच नाही. आज मला कोरोना व्हायरसने विळख्यात घेतले. मात्र मला मदत कुणाची मिळावी, अशी मी अपेक्षा करावी? मला आशा होती ती इतरांकडून, पण… शेवटी,  ‘दिसते तसे नसतेच...’एवढेच मला कळले.

अधिक वाचा  :  तपासणी न करताच निघाला रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, काय झाले असे...

फार वेदना होतात हो तुमच्या तिरस्काराने
आज मला कोरोना व्हायरस झाल्याने गावातील सगळे मला टोमणे मारतात. तिरस्काराच्या नजरेने माझ्याकडे पाहतात. माझ्याबद्दल चर्चा रंगत आहेत. ‘त्याला होणारच होता, खूप फिरला...’ अरे पण कुणासाठी? तुमच्यासाठीच ना.! धावलो कोणासाठी? तुमच्याचसाठी ना! मदतच केली ना... माणुसकीसाठीच ना! ज्या गावात लोक माझा गर्व करायचे, आज तिथेच माझा तिरस्कार होतो आहे. मी कुणाकडे पाहून जगायचं? मी माझा विचार केला असता तर मी व माझा परिवार आज सुखी समाधानी आणि आजार मुक्त राहीलो असतो. आज जे माझे हाल होत आहेत, ते तुमच्यामुळे.. तरीही मी कुणाला दोष देत नाही. पण मला मदत करु शकत नाही तर कमीत कमी माझ्याबद्ल अफवा तरी पसरवू  नका. माझे मनोबल कमी करु नका. मला सहारा देता येत नसेल तर देऊ नका. पण तिरस्कार तरी करु नका. माझ्या मुलाबाळांना, माझ्या पत्नीला, आईवडीलांना फार वेदना होतात हो तुमच्या तिरस्काराने....
 
संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT